Shocking Video of dispute: अनेकदा आपण राहतो त्या चाळ, सोसायटी किंवा बिल्डिंगमध्ये लहान लहान गोष्टींवरून वाद होत असतात. शेजाऱ्यांध्ये वाद होणं काही नवीन गोष्ट उरलेली नाही; पण या वादाला किती भयंकर रूप द्यायचं हे प्रत्येकाच्याच हातात असतं. उगाच राईचा पर्वत करून फक्त भांडायचं म्हणून का जण भांडण उकरून काढतात आणि समोरच्याला नको नको त्या गोष्टी ऐकवतात.

कधी कधी भांडण इतक्या टोकाला जातं की, त्याचं रूपांतर मारामारीत होतं. सध्या असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका साध्या वादावरून एक पुरुष एका तरुणीला मारहाण करताना दिसतोय. नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊ.

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

विरारमध्ये एकाच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबानं महिला आणि तिच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरवाजावर खिळे ठोकल्याच्या वादातून हा प्रकार घडला, ज्याचं हिंसक हल्ल्यात रूपांतर झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… पैशांचा कसला माज दाखवता! कार चालकाने पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर उडवले पैसे अन्…, संतप्त VIDEO व्हायरल

मारहाणीचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि एका माणूस यांच्यात वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या दोघांचं शा‍ब्दिक भांडण सुरू असताना तो माणूस तरुणीला हात लावतो. त्यानंतर तरुणीची आई मधे पडते आणि तीदेखील त्या माणसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तरुणीला हात लावल्यानं तरुणी माणसाला धक्का देते आणि त्यावर संतप्त होऊन, तो माणूस तरुणीला मारहाण करतो. हे भांडण इतक्या टोकाला जातं की, तो माणूस तरुणीचे केस ओढतो आणि तिच्या आईसह तिला जमिनीवर जोरात आदळतो.

हा व्हिडीओ @punepulse या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार विरार पूर्व येथील विवा जहांगीर कॉम्प्लेक्समधील तुलसी धाम सोसायटीच्या इमारतीत बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास हा हल्ला झाला. महिला आणि तिच्या मुलीला आरोपी गौतम पांडे आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे यांनी जबर मारहाण केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ७४, ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास सुरू आहे.

हेही वाचा… “आम्हाला माफ करा महाराज”, छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान पाहून तरुणीचे अश्रू अनावर, चित्रपटगृहात ढसाढसा रडू लागली अन्…, पाहा VIDEO

u

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “त्या माणसाची तक्रार केली पाहिजे. किती निर्दयीपणे त्यानं आई आणि लेकीला मारलं आहे. निर्लज्ज.” दुसऱ्यानं “काहीही असो, यांची मुलीवर हात उचलण्याची हिंमत तरी कशी होते?”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “त्या माणसाच्या घरी कोणी बाईमाणूस नाही का? अशांना पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे.”

Story img Loader