वडिल आणि मुलाचे नात्यावर प्रकाश टाकणारे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात काही मजेशीर पण सध्या वडिल आणि मुलाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक वडील कॅफेमध्ये जाऊन मित्रांसह मजा मस्ती करणाऱ्या मुलाला मारताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना स्वत:चे बालपण आठवले तर काहींनी मुलाला वडिलांनी केलेल्या मारहाणीवर आक्षेप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा घरातून कोचिंग क्लास जातो असे सांगून निघाला होता आणि एका कॅफेमध्ये आपल्या मित्रांसह मजा मस्ती करत होता.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, काही लोक एका कॅफेमध्ये बसलेले आहेत. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्याच्या मुलाला मारायला सुरुवात करतो. मुलगा क्लास ऐवजी कॅफेमध्ये जात असल्याचे त्यांना कोणीतरी कळवले होते. त्यामुळे मुलांचे आई-वडील तेथे आले होते. वडिलांनी तेथे येऊन त्याला चोप देऊन घरी घेऊन गेले. या व्यक्तीने त्यांच्या मुलांसह इतर मुलांनाही मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.
व्यक्तीने मुलांना केलेली मारहाण पाहून लोकांना बसला धक्का
व्हायरल व्हिडीओमध्ये हा व्यक्ती एका मुलाला विचारत आहे की, “फोनवर काय सांगितले होते तू?” आणि त्याच्या कानाखाली मारतो. हा व्यक्ती तिथे मुलांना मारहाण करत होतो तेव्हा लोकांना आश्चर्याने पाहत होते. काही लोकांनी मुलांना मारणाऱ्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर सर्व मुलं आणि आई-वडील तेथून निघून जातात.
हेही वाचा – शिमला फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडर झाला क्रॅश; थोडक्यात वाचला जीव; व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा – ‘बेशरम रंग’ गाण्यावर शाळकरी मुलाने केला जबरदस्त डान्स! व्हिडीओ पाहून दीपिका पदुकोणलाही विसरून जाल
सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया
घर के कलेश नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर समीश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला की, “मी आशा करतो असे पुन्हा कोणासह घडू नये” तर दुसरा म्हणाला, “कसे आईवडीला आहेत जे स्वत:च्या मुलाला सर्वांसमोर मारत आहे.”