Scooty Fancy Number Viral News : नवनवीन गाड्या खरेदी करण्यासाठी शोरुममध्ये लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. आपल्या घरात नवीन फॅमिली मेंम्बर यावा असं अनेकांना वाटतं. मग ते लहान बाळ असो किंवा एखादी नवीकोरी गाडी…पण एका तरुणाने स्कुटी खरेदी केल्यानंतर अजबच शक्कल लढवली आहे. सामान्य माणसालाही वाटतं कधीतरी माझं नाव व्हीआयपींच्या यादीत यावं. यासाठी काही लोकं काय करतील याचा नेम राहिला नाही. हिमाचल प्रदेशच्या एका तरुणाने स्कुटीला फॅन्सी नंबर मिळण्यासाठी तब्बल १.१२ कोटी रुपयांची बोली लावली. स्कुटीला HP-99-9999 हा फॅन्सी नंबर मिळावा यासाठी तरुणाने कोटी रुपयांची बोली लावल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, शिमला जिल्हा प्रशासनाकडून या लिलावाबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आलीय.

हिमाचल प्रदेशच्या वाहतूक विभागाच्या बेवसाईटनुसार, देशराज नावाच्या तरुणाने Hp-99 अशाप्रकारच्या तीन नंबरच्या सीरीजसाठी १ कोटींहून अधिक पैशांची बोली लावली. चारचाकी गाडीसाठी संजय कुमारने १.११ कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, देशराजने १,१२,१५,५०० रुपयांची बोली लावून बाजी मारली. तर धर्मवीरने दुसऱ्या दुचाकीच्या नंबर प्लेटसाठी १,००,००,५०० रुपयांची बोली लावली होती. दरम्यान, कोटखाईच्या रजिस्ट्रेशन आणि लायसनींग ऑथोरिटीने तिनही नंबरसाठी लिलाव केला नाही. यामध्ये HP-99-9999 या नंबरचाही समावेश आहे. आयकर विभाग आणि राज्य वाहतूक विभागाकडून यासंबधीत सर्व गोष्टींची तपास सुरु असल्याचंही समजते आहे.

Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही

नक्की वाचा – Video : नॅनो कारला धडक दिल्यानंतर थार झाली पलटी, आनंद महिंद्रांना टॅग करत युजर म्हणाला, “सर, थार गाडीत समस्या…”

“कोटखाई (RLA) मध्ये बोली लावणाऱ्यांचा संपूर्ण तपशील आम्ही शोधला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा लिलाव करण्यात आला होता. पोर्टलवर बोली लावणाऱ्यांची कमीत कमी ३० टक्के रक्कम जमा झालीय की नाही, याबाबत आम्ही खातरजमा करणार आहोत,”अशी माहिती राज्य वाहतूक विभागाचे डायरेक्टर अनुपम कश्यप यांनी हिंदूस्तान टाईम्सला दिलीय. तसेच शिमलाचे उपायुक्त आदित्य नेगी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, बोली लावणाऱ्यांना स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला द्यावा लागेल. कोणत्याही देशातले असले, तरी वाहनाच्या नोंदणीसाठी स्थानिक रहिवाशी असण्याची आवश्यकता असते.”

Story img Loader