प्रवासादरम्यान मुद्दाम हेल्मेट न घालणे , गाडी वेगात चालवणे, ट्रॅफिक नियम तोडणे आदी अनेक कारणांसाठी वाहतूक पोलीस अनेक दुचाकीस्वारांना दंड भरण्यास सांगतात. पण, स्वतःची चूक स्वीकारणं सोडा अनेक दुचाकीस्वार वाहतूक पोलिसांशी वाद घालतात.तर आज बंगळुरूमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. एका तरुणास विनाहेल्मेट प्रवास करताना पकडल्यानंतर त्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे बोट चावलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सय्यद रफी हा प्रवासी हेल्मेट न घालता प्रवास करत असतो. तर वाहतूक पोलीस कर्मचारी विल्सन गार्डन १०th ग्रॉस येथे त्याला थांबवतात आणि त्याच्या दुचाकीची चावी जप्त करतात. पोलिसांनी अडवले म्हणून प्रवासी दुचाकीवरून उतरतो आणि गैरवर्तन करतो. त्यामुळे हे भांडण टोकाला जाताना दिसते. बघता बघता प्रवासी रागात ट्रॅफिक पोलिसांचा हात पकडतो आणि त्यांचे बोट चावतो. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Crime of theft, employee Spice Jet Airlines,
स्पाईस जेट एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
old man suicide rumour, lohmarg Police,
ठाणे : प्रवाशांसोबतच्या वादानंतर वृद्धाने आत्महत्या केल्याची अफवा; अफवांवर विश्वास ठेवू नका, लोहमार्ग पोलिसांचे आवाहन
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला
Thane, woman molestation in thane, molestation, airline employee, Naupada police, Pachpakhadi, complaint, safety, womens safety, thane news
ठाण्यात विमान कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग
navi mumbai police patrolling in deserted place
नवी मुंबई: निर्जनस्थळी गस्तीचा प्रस्ताव कागदावरच?

हेही वाचा…‘मी बुकिंगसाठी पैसे…’ रॅपिडो बाइकचे पेट्रोल संपताच प्रवाशाने दिला खाली उतरण्यास नकार; VIDEO पाहून म्हणाला, “माणुसकी…”

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा दुचाकीस्वार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे बोट चावतो तेव्हा तिथे उपस्थित हेड कॉन्स्टेबल सिद्धरामेशवर संपूर्ण घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेत असतात. तेव्हा मोबाईलच्या समोर हा तरुण उभा राहतो आणि सांगतो मी रुग्णालयात जात होतो आणि घाईगडबडीत हेल्मेट घालायला विसरलो. हे बोलताच तरुण हेड कॉन्स्टेबलचा फोन खेचून घेतो. तसेच यादरम्यान तरुणाने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्याला वेळीच पकडलं.

सोशल मीडियावर ही पोस्ट @rakeshprakash1 या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये या घटनेचा व्हिडीओ, तक्रार केल्याचा फोटो आणि तरुणाचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ करणे, शारीरिक दुखापत करणे, धमकी देणे आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ; असे पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच सोशल मीडियावर या घटनेने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.