IPL 2024 Viral Video : आयपीएल २०२४ चा १८ वा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामन्यासाठी चाहते महागडी तिकिटे घेऊन स्टेडियममध्ये पोहोचले, मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या एका चाहत्याबरोबर स्टेडियममध्ये पोहोचताच असे काही घडले, जे पाहून तुम्हाला धक्का बसेल.’

काय आहे संपूर्ण प्रकरण?

चार हजार ५०० रुपयांचे तिकीट घेऊन सीएसकेचा चाहता स्टेडियममध्ये पोहोचला, मात्र स्टेडियममध्ये त्याच्याबरोबर जे घडले ते आश्चर्यचकित करणारे आहे. स्टेडियममध्ये त्या चाहत्याला बुक केलेली सीट तिथे नसल्याचे दिसले, ज्यामुळे चार हजार ५०० रुपयांचे तिकीट खरेदी करूनही त्याला उभं राहून संपूर्ण सामन्याचा आनंद घ्यावा लागला. या तरुणाने ट्विटरवर त्याच्याबरोबर घडलेल्या या फसवणुकीच्या प्रकारावर सविस्तर सांगितले आहे. जुनैद अहमद असे या तरुणाचे नाव आहे.

Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta balmaifal Kashmir Tour Himalayas Natural Beauty
काश्मीरची संस्मरणीय सहल
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
thane accidental death Social activist Pushpa Agashe CCTV cameras teen hath naka
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
first class Dabhade team surprised audience with Rs 112 tickets on its release day
पहिल्याच दिवशी ११२ रुपयांत तिकीट; ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
Viral video of Biker got stuck between two buses while overtaking stunt goes wrong
काय गरज होती? ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमधच अडकला, VIDEO पाहून कपाळावर माराल हात

हेही वाचा – ना पेट्रोल, ना वीज! तरुणाने जुगाडद्वारे बनवली ७ सीटर सोलर बाईक; VIDEO पाहून हर्ष गोयंका अवाक्, म्हणाले, क्या होगा उनका?

त्यानी पोस्टमध्ये लिहिले की, त्याने चार हजार ५०० रुपयांचे तिकीट विकत घेतले, पण जेव्हा तो ते तिकीट घेऊन स्टेडियममध्ये पोहोचला तेव्हा त्यावरील सीट क्रमांक J 66 स्टेडियममध्ये कुठेही आढळला नाही. म्हणजे तिथे त्याच्या तिकिटावरील सीट नंबरच दिसत नव्हता. याप्रकरणी जुनैदने तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे. कारण सीट मिसिंगमुळे त्याला उभे राहून सामना पाहावा लागला.

चाहत्याने उभा राहून पाहिला सामना

जुनैदच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये झालेल्या CSK आणि SRH सामन्यात त्याचा सीट क्रमांक J66 गायब होता. या तिकिटासाठी त्याने साडेचार हजार रुपये भरले होते. जुनैदने तिकिटाचा फोटो तसेच एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे.

फोटोत स्टेडियममध्ये उपस्थित असलेला एक स्वयंसेवकही त्याला सीट शोधण्यात मदत करताना दिसतोय, पण त्यालाही ती सीट मिळाली नाही.

जुनैदची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. अनेकांना त्याच्या तिकिटाचा परतावा मिळाला की नाही हे जाणून घ्यायचे आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली आहे. या प्रकरणात एक मनोरंजक ट्विस्ट आला, जेव्हा जुनैदने दुसऱ्या पोस्टमध्ये सांगितले की, त्याची सीट J66 नंतर J69 आणि J70 दरम्यान सापडली. ब्रेकदरम्यान त्याने ही सीट पाहिली. कोणीतरी ही चूक केली आहे, असे त्याने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Story img Loader