Dellhi CCTV Video Viral: देशाची राजधानी दिल्लीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावर राहणाऱ्या एका व्यक्तीनं उघड्यावर लघवी करणाऱ्या आरोपीला हटकलं. ज्यामुळे रागावलेल्या आरोपीनं सदर व्यक्तीला काठीनं जबर मारहाण केली. सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दिल्लीच्या मॉडेल टाऊन परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीनं अशाप्रकारे चांगला नागरिक होण्याचं कर्तव्य निभावल्यावरही त्याला अमानुष मारहाण झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये काय दिसलं?

व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, दुचाकीवरून उतरून आरोपी रस्त्यावर झोपलेल्या एका इसमाकडे येताना दिसतो. आरोपी आधी झोपलेल्या माणसाला उठवतो आणि नंतर न थांबता त्याला काठीनं बदडतो. अतिशय अमानुष पद्धतीनं ही मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण होत असतान रस्त्यावर कुणीही दिसत नाही. तर आरोपीचे दोन मित्र पुढे काही अंतरावर दुचाकीवरच थांबल्याचे दिसत आहे.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

तब्बल २० सेकंद न थांबता आरोपी पीडित व्यक्तीला मारत राहतो. जेव्हा तो मारून पुन्हा दुचाकीकडे वळतो. तेव्हा पीडित व्यक्ती मदतीसाठी हाका मारू लागतो. त्यानंतर चिडून आरोपी पुन्हा मागे वळून त्याला आणखी मारहाण करतो. याहीवेळेस तो काही सेकंद न थांबता आरोपीला मारत राहतो. तब्बल ५२ सेकंदाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याचवेळी रस्त्यावर समोरून एक चारचाकी येताना पाहून आरोपी तिथून पळ काढतो. सीसीटीव्हीमध्ये समोरच्या बाजूला एक उद्यान दिसत आहे. जिथे लोक मॉर्निंग वॉक करत आहेत. पण कुणीही आरोपीला वाचविण्यासाठी आवाज दिला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आर्यन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच परिसरात आरोपी घरकाम करतो.

आरोपीनं का मारहाण केली?

मारहाणीच्या एक दिवस आधी म्हणजेच गुरुवारी (दि. ३ ऑक्टोबर) आरोपी उद्यानाजवळील उघड्या जागेत लघवी करत होता. यावेळी पीडित व्यक्ती रामफलनं त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये खटके उडाले. याच गोष्टीचा राग धरून दोन दिवसांनी आर्यननं रामफलला सकाळी बेदम मारहाण केली. अटक झाल्यानंतर आर्यनला तात्काळ जामिनही मिळाला.

Story img Loader