सरकारी नोकऱ्यांची क्रेझ आपल्या देशात खूप पाहायला मिळते. वास्तविक, सरकारी नोकरीत नोकरीची सुरक्षा असते. लहानपणापासूनच प्रत्येक मूल सरकारी नोकरीचे स्वप्न पाहू लागते. कुटुंबातील सदस्यही आपल्या मुलांना सरकारी नोकरीसाठी प्रवृत्त करतात, त्यामुळेच मुल खूप कष्ट करतात. मात्र, बहुतांश लोकांना सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळेही देशात सरकारी नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. दुसरीकडे प्रत्येक पालकालाही आपल्या मुलीचे लग्न सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाशी करायचे असते. बहुतेक पालक सरकारी नोकराला जावई म्हणून प्राधान्य देतात. मात्र यामुळे त्या मुलावर अपेक्षेचं किती ओझं झालेलं असतं याचा कुणीही विचार करत नाही. अशाच एका मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मुलगा सरकारी नोकरीसाठी घरापासून लांब शहरात आला आहे. यावेळी त्याच्या आईसोबत फोनवरचा संवाद एकून तुम्हीही भावूक व्हाल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे दिसत आहे. तो ट्रेनमध्ये आहे आणि त्याच्या आईशी बोलत आहे. विद्यार्थी खूप अस्वस्थ आहे पण तरीही तो बरा असल्याचं आईला सांगतोय. एवढेच नाही तर त्याच्या आईने त्याला जेवणाबद्दल विचारले असता तो म्हणतो की हो मी जेवले आहे. तसेच रेल्वे ब्रीजवर तो झोपला असताना आईला मात्र मी हॉटेलमध्ये आहे असं सांगतो. हा व्हायरल व्हिडिओ कंटेंट क्रिएटर अद्वयकुमारबाजपेयी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी तो शेअरही केला आहे.
सरकारी नोकरीसाठी परिक्षा देण्यासाठी शहरात आलेल्या मुलाचे कसे हाल होत आहेत हे या व्हिडीओमध्ये पहायाला मिळत आहे. व्हिडीओवर लोक आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ लोकांना भावूक करत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पूर्वी इंटरनेट नव्हते तेव्हा लोक काय करायचे? १९३० सालचा VIDEO होतोय तुफान व्हायरल
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘काय सांगू, माझे शब्द संपले आहेत.’ दुसर्या यूजरने लिहिले की, ‘मुले खरोखरच संघर्ष करतात’, तर दुसर्या यूजरने लिहिले – मी देखील याच परिस्थितीतून जात आहे.