सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत, काहींची लग्न धुमधडाक्यात पार पडत आहेत, तर अनेकजण आपलं लग्न कधी होणार या विचारात आहेत. मात्र, सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. कारण एका तरुणाने मुलीकडच्या मंडळीनी लग्नातील हुंड्यात जुने फर्निचर दिल्याचा आरोप करत चक्क लग्न मोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील एका तरुणानो लग्नातील हुंड्यात जुने फर्निचर मिळाल्याने आपलं लग्न मोडलं आहे. मोहम्मद झाकीर वय २५ असं या नवऱ्या मुलाचे नाव आहे. तो बस ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर त्याचे लग्न २२ वर्षीय हिना फातिमासोबत ठरलं होतं. मात्र, रविवारी तो स्वत:च्या लग्नाच उपस्थित राहिला नाही. या घटनेनंतर फातिमाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय मुलाच्या वडिलांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही मुलीच्या वडिलांनी केला आहे.
हेही वाचा- नवरदेवाच्या गळ्यात पैशांच्या नोटांचा हार घालणं पडलं महागात, स्कुटीवरुन आलेल्या दोघांनी सर्वांसमोर…
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, नवऱ्याकडील मंडळींनी मागितलेल्या वस्तू दिल्या नसल्याचा आणि फर्निचरही जुने दिल्याचे सांगत लग्नाला नकार दिला. शिवाय आपण लग्नाची सर्व व्यवस्था केली होती, सर्व नातेवाईक आणि पाहुण्यांना आमंत्रित केले होतं आणि अचानक नवर मुलगा च्या लग्नाला आला नाही. याबाबतची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
हेही वाचा- “प्यार किया तो डरना क्या” भरवर्गात शिक्षकांसमोर गर्लफ्रेंडशी बोलणाऱ्या विद्यार्थ्याचा Video व्हायरल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराच्या कुटुंबीयांना हुंड्यात इतर वस्तूंसह फर्निचरची मागणी केली होती, परंतु जेव्हा त्यांना समजले की आपल्याला हुंड्यात जुने फर्निचर दिले आहे त्यावेळी त्यांनी लग्न रद्द केले. आयपीसी आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत वराच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.