भारत प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश वेगाने पुढे जात आहे. याची अनेक उदाहरणं आपणाला पाहायला मिळत आहेत. डिजिटल इंडियामुळे अनेक लोक वेगवेगळी कामं तंज्ञानाच्या साह्याने करत आहेत. कारण आधी लोक पैसे काढण्यासाठी बँकेत रांगा लावायचे, त्यानंतर मग एटीएम मशीन आले. त्यामुळे काही मिनिटांतच बँकेच्या रांगेत तासनसात उभं न राहता काही मिनिटात एटीएम मशीनमधून पैसे काढता येऊ लागले. अशातच आता तंत्रज्ञानाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे एटीएम कार्ड नसतानाही तुम्ही तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता. देशाची ही प्रगती पाहून महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील खूप खुश झाले आहेत.

UPI ATM पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क –

ED seized assets worth Rs 43 crore 52 lakh in case of defrauding bank group
बापरे, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नावानेही फसवणूक
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Audit Provisions in the Income Tax Act
प्राप्तिकर कायद्यातील लेखापरीक्षणाच्या तरतुदी- प्रवीण देशपांडे
what is waterspout
यूपीएससी सूत्र : डॉक्टरांना केंद्रीय संरक्षण कायद्याची गरज अन् वॉटरस्पाउट म्हणजे काय? वाचा सविस्तर…
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
national news in marathi ashwini vaishnaw support lateral entry in govt jobs sonia gandhi rare photo with jaya bachchan
चांदनी चौकातून : समर्थन याचेही…त्याचेही
Gaganyaan astronauts
Gaganyaan Astronaut: गगनयान मोहिमेत अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे? इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले…
Urgent need for national legislation for safety of healthcare workers across India
आम्ही सवलत नाही, संरक्षण मागतो आहोत…

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची गरज नाही. देशातील पहिले व्हाईट लेव्हल UPI-ATM लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुम्ही डेबिट कार्डशिवाय UPI द्वारे पैसे काढू शकता. या नवीन सेवेचे कौतुक करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, भारतातील डिजिटल वित्तीय सेवा ज्या वेगाने वाढत आहेत, ते कौतुकास्पद आहे. डिजीटल सेवा आता कॉर्पोरेट केंद्रीत होण्याऐवजी ग्राहक केंद्रित होत आहेत.

हेही पाहा- महामार्गावरील उभ्या ट्रकला भरधाव कार धडकली, ६ जणांचा जागीच मृत्यू, थरारक अपघाताचा VIDEO व्हायरल

क्रेडिट कार्ड कंपन्यांचे टेन्शन वाढू शकते –

आनंद महिंद्रा यांनी या नवीन एटीएमचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “या UPI ATM चे अनावरण ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ मध्ये करण्यात आले. भारत ज्या गतीने वित्तीय सेवांचे डिजिटायझेशन करत आहे आणि त्यांना कॉर्पोरेट केंद्रित न करता ग्राहक केंद्रित बनवत आहे. (मात्र, ही क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी धोक्याची घंटा?) असू शकते.” तर त्यांनी पुढे मिश्कील टिप्पनी करताना लिहिलं आहे, “आता मला फक्त खात्री करायची आहे की, मी माझा सेलफोन चुकीच्या ठिकाणी ठेवणार नाही.”

हिताची पेमेंट सर्व्हिसेसने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने UPI ATM लाँच केले आहे. याद्वारे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय UPI द्वारे रोख रक्कम काढू शकतात. या एटीमचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती UPI द्वारे ATM मधून पैसे कसे काढायचे ते सांगत आहे.

असे काढू शकता पैसे –

UPI ATM द्वारे रोख रक्कम काढण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे, स्क्रीनवर UPI निवडणे, त्यानंतर ATM मधील रक्कम निवडा आणि निवडलेल्या रकमेशी संबंधित UPI QR कोड स्कॅन करा. तुम्ही मोबाईलवर QR कोड स्कॅन करताच, तुम्हाला UPI अॅपचा पर्याय आणि बँक खात्याबद्दल विचारले जाईल. व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा. त्यानंतर तुमची रक्कम बाहेर येईल. तुमच्या स्मार्टफोनमधील कोणत्याही UPI अॅपद्वारे तुम्ही पैसे काढू शकता.