Crocodile Rescue Operation Video Viral: वन्यप्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमधून कधी वन्यप्राण्यांची शिकार कशी केली जाते हे दाखवले जाते, तर काही व्हिडीओंमधून प्राण्यांचा माणसांवरील हल्ला, प्राण्यांचे रेस्क्यू ऑपरेशन, तर कधी त्यांचे गमतीशीर प्रसंग दाखवले जातात. यात आता एका महाकाय मगरीच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओतील महाकाय मगरीमुळे एका गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच त्या मगरीला रेस्क्यू केले, पण या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान एक व्यक्ती मगरीला खांद्यावरून नेताना दिसतोय, हे दृश्य पाहताना फारच भयानक वाटतेय.
एका व्यक्तीने महाकाय मगरीला खांद्यावर उचलले अन्…
मगरीला पाहूनच भल्याभल्यांना घाम फुटतो, त्यामुळे तिच्या जवळ जाणे दूरच, लोक तिला लांबूनही अतिशय सावधपणे पाहतात. कारण प्राणी असो वा माणूस, मगर त्यांना काही वेळातच आपली शिकार बनवते. पण, व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महाकाय मगरीला खांद्यावर उचलते आणि तिला घेऊन चालायला लागते. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस एका मोठ्या मगरीला खांद्यावर घेऊन जाताना स्पष्ट दिसत आहे. त्याने मगरीला तांदळाच्या पोत्याप्रमाणे खांद्यावर घेऊन रेस्क्यू व्हॅनपर्यंत नेले. या मगरीचे वजन इतके आहे की घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची पावलं लटपटतायत. पण, तरीही ती व्यक्ती मगरीला घेऊन चालतेय. मगरीला खांद्यावर घेऊन जाणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर एक वन कर्मचारी आहे.
हेही वाचा – थार चालकाचे भररस्त्यात धक्कादायक कृत्य, कारच्या छतावर टाकली माती अन्…Video व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक अवाक् झाले आहेत. मगरीच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा हा व्हिडीओ एक्सवर @ManojSh28986262 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युजरने म्हटले आहे की, गावातील लोक गेल्या काही आठवड्यांपासून मगरीच्या हल्ल्याच्या भीतीने जगत होते, कारण काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी मगरीला पाहिले होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मगरीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला पाचारण केले आणि यावेळी वनविभागाने यशस्वीपणे मगरीला जेरबंद करत गावकऱ्यांच्या मनातून हल्ल्याची भीती दूर केली.