King Cobra Viral Video : साप समोर दिसला की भल्या भल्यांच्या अंगावर काटा उभा आल्याशिवाय राहत नाही. पण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी काही जण सापाच्या जवळ जाऊन त्याच्यासोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न करतात. एका तरुणाने तर जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक समजल्या जाणाऱ्या किंग कोब्रासोबतच पंगा घेतला. व्हिडीओ बनवण्यासाठी किंग कोब्रासारख्या विशाल सापासोबत खेळ करणं अनेकांच्या जीवावर बेतल्याचं आपण व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिलं आहे. आताही अशाच प्रकारचा किंग कोब्राचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणाने किंग कोब्राची शेपटी पकडल्यानंतर रागाणे फणफणलेला कोब्रा त्या तरुणाच्या अंगावर धावला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुमचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किंग कोब्राची शेपटी पकडल्यानंतर तरुणाची पळता भुई झाली, पाहा व्हायरल व्हिडीओ

किंग कोब्रा सापाची आंघोळ करतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिले असतील. पण सापाच्या जवळ जाऊन त्याला चिडवण्याचा प्रयत्न करण्याऱ्या काही माणसांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचंही व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. सापांपासून नेहमी दोन हात लांबच राहिलेलं चांगलं, असं म्हणतात. ते सत्यच आहे. कारण सापाच्या मनात काय सुरु आहे आणि तो कोणत्या क्षणी दंश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. एक तरुण किंग कोब्रा सापाला पकडण्यासाठी त्याच्या शेपटीला धरतो. त्यानंतर किंग कोब्रा साप त्याच्या अंगावर धावताच तरुणाचा थरकाप उडतो. किंग कोब्रा सापाने फणा काढल्यानंतर तो तरुणाला दंश करण्याचा प्रयत्न करतो. पण चिडलेल्या किंग कोब्रा सापाला तो मुलगा कसाबसा सावरतो आणि त्याच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा – Video : पिंजरा उघडताच सिंहाने दोघांच्या मानेवर घेतली मोठी झेप, नियम मोडला अन् घडलं भलतच…

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी अनेक जण व्हिडीओ करण्यासाठी जीव धोक्यात टाकतात. कधी जंगलातील हिंस्र प्राण्यांसोबत मस्ती करण्याचा प्रयत्न काही जण करतात. तर कधी विषारी सापांसोबत खेळण्याचा मुर्खपणाही करतात. सापांना पकडून व्हिडीओ करण्याचा वेडेपणा काही माणसांच्या जीवावर बेतल्याचं अनेक घटनांच्या माध्यमातून समोर आलं आहे. कोब्रा म्हणजचे नागासोबत खेळायला काहींना आवडतं. पण नागाच्या दंशामुळे मृत्यू होईल, याची जराही भीती काही जणांना नसते. अशातच एकाने नाग तर सोडाच किंग कोब्रासोबत खेळ करायचं ठरवलं आणि काही वेळानंतर त्या सापानेही त्याचा रंग दाखवला. हा थरारक व्हिडीओ द किंग ऑफ स्नेक नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man catches king cobra snakes tail few seconds later snakes tries to attack on a man socking video goes viral nss