तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक भितीदायक व्हिडीओ पाहिले असतील. आजकाल सापांशी संबंधित अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतोच. त्यात असे काही व्हिडीओ आहेत जे इंटरनेट वापरकर्त्यांना पाहिल्यानंतर त्यांचा थरकाप होतो. त्याच वेळी अनेक व्हिडीओ देखील खूप थरारक आहेत. आजकाल असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याला पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरातील सोफ्यावर फिरत होता ७ फूट लांबीचा साप

व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने ७ फूट लांब साप हातात धरलेला दिसत आहे. या दरम्यान, काहीतरी असे घडते ज्यामुळे तुमचा चेहरा कोरडा होऊ शकतो. हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. फेसबुकवर लिहिलेल्या कॅप्शननुसार, साप घराच्या सोफ्यावर फिरत होता. घराचा मालक कार्यालयातून परत आला तेव्हा त्याला हा साप सोफ्यावर फिरताना दिसला. हे पाहून त्या व्यक्तीचे हृदय हादरले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडीओ कॅलिफोर्नियाचा आहे, जिथे एका माणसाच्या घरात असलेल्या सोफ्यावर एक साप आराम करत होता. यानंतर घराचा मालक साप पकडणाऱ्याला बोलावतो. सात फूट लांबीच्या सापाला काबूत आणण्याचा सर्प पकडणारा अत्यंत आरामात प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी यादरम्यान असे काही घडते, जे पाहून इंटरनेट वापरणाऱ्यांची झोप उडाली आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा सर्प पकडणारा त्या सापाला आपल्या हातात उचलतो तेव्हा अचानक साप त्याच्या अंगावर येणाचा प्रयत्न करतो. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साप अतिशय भितीदायक पद्धतीने हिसका मारत आहे. साप पकडणारा एवढा तरबेज असला तरी या व्हिडीओत सापाने मारलेला हिसका त्याच्या शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि तो थोडक्यात निसटतो.

फेसबुकवर So-Cal Rattlesnake Removal नावाच्या पेजवर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.