Shocking video: सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असतं. काहीवेळा अशा घटना समोर येतात की धक्काच बसतो. दरम्यान काही कारणामुळे आपण घरचा डबा घेऊन जात नाही. त्यानंतर आपण बाहेर काहीतरी खातो. पण असे खाद्यपदार्थ सुरक्षित असतीलच असं नाही. सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात.हॉटेलमध्ये पाळली न जाणारी अस्वच्छता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे हल्ली लोक हॉटेलमध्ये जाणं टाळतात, मात्र विचार करा आता लग्नाचं जेवणही सुरक्षित नाहीये असं तुम्हाला कुणी सांगितलं तर? हो सध्या एका लग्नातला समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे लग्नाला गेल्यावर जेवण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लग्न सराईचा सिझन आहे, यावेळी लग्नात मस्त जेवायला मिळणार या आशेने तुम्हीही लग्नाला जात असाल तर थांबा… सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहाल तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. मेरठमधील एका लग्नात एका तरुणाने थुंकी लावून रोट्या बनवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो रोटीवर थुंकतो, नंतर ती भाजण्यासाठी तंदूरमध्ये ठेवतो. तो अशाच प्रकारे एक-एक करून १० रोट्या बनवतो.रोटीवर थुंकणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या भर मांडवात जेवण बनवण्याचं सुरु आहे. हल्ली लग्नात तंदूरमध्ये गरम गरम रोट्या दिल्या जातात. याच आपण चवीनं खातो मात्र त्यामागची परिस्थिती पाहिली तर खरंच हे फार गंभीर असल्याचं लक्षात येईल. आजूबाजूला लोकांची इतकी गर्दी असतानाही हा व्यक्ती बिनधास्तपणे रोटीवर थुंकत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @bstvlive नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक चिडले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.