Man Changed Sex For Daughter: आई वडील आपल्या मुलांना जन्म देण्यापासून त्यांचे संगोपन करून स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत सगळं करतात. पण काही वेळेला आई वडिलांमधील भांडणांनी मुलांच्या जीवाची फरफट होते. जेव्हा ही भांडणं विकोपाला जातात तेव्हा घटस्फोट घेतला जातो आणि मग मुलांचा ताबा कोणाला मिळणार यावरून वाद सुरु होतात. बहुतांशवेळा आईलाच मुलांचा पूर्ण ताबा दिला जातो. अलीकडेच एका घटस्फोटाच्या खटल्यातही असाच काहीसा निर्णय अपेक्षित होता पण पण आपल्या लेकींचा ताबा मिळवण्यासाठी वडिलांनी चक्क स्वतःचे लिंग बदलल्याचे समजत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. घटस्फोट घेतल्यानंतर त्याला आपल्या मुली आपल्याकडेच राहाव्यात अशी त्याची इच्छा होती पण कायद्यानुसार मुलींचा ताबा त्याच्या पत्नीला म्हणजेच त्या मुलींच्या आईकडे जाणार असे समजत होते. अखेरीस त्याने आपणच त्या मुलींची आई आहोत हे दाखवण्यासाठी चक्क कायदेशीर रित्या आपले लिंग बदलले आहे.

४७ वर्षीय रेने सेलिनास रामोस असे या व्यक्तीचे नाव आहे. रेने यांनी सांगितल्याप्रमाणे मागील पाच महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. मुली आपल्या आईकडे असताना नाराज असल्याचे रेने म्हणतात. आपण पाच महिन्यापासून मुलींना पाहिलेही नव्हते. जर आईकडेच मुलींचा ताबा देण्याचा कायदा असेल तर आता मी सुद्धा एक स्त्री आहे आणि त्यांची आईही आहे.

पुढे रेने म्हणतात, “मला माहीत आहे मी काय केलं. आईपेक्षा पुरुष मुलांची काळजी घेण्यास कमी सक्षम असतात, हा गैरसमज आहे. मी आईप्रमाणेच मुलींना प्रेम आणि संरक्षण देऊ शकतो. ‘बाप होणं हा या देशातला शाप आहे. इथे पुरुषांकडे फक्त एक प्रदाता म्हणून पाहिलं जातं.”

हे ही वाचा << ६० बाळं, ३ बायका.. ५० वर्षीय माणसाचं कुटुंब पाहून व्हाल थक्क; पाकिस्तानात राहून करतो ‘हे’ काम

दरम्यान, व्हाईस न्यूजच्या मते या घटनेनंतर LGBTQ समुदायाने रेनेच्या निर्णयाविरुद्ध पवित्रा घेतला आहे. रेनेच्या लिंग बदलाच्या मुद्द्यावर भविष्यात याचा गैरवापर केला जाऊ शकतो. या कारवाईसह ट्रान्सजेंडर हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी लागू केलेल्या कायद्याबद्दल चिंता वाटत असल्याचे LGBTQ समुदायातील काही सदस्यांनी सांगितले आहे.