अनेकांना घरी किंवा ऑफिसमध्ये काम करताना काहीतरी चटपटीत, कुरकरीत, तिखट खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेकजण लेस चिप्स, कुरकुरे खाणे पसंत करतात. पण, पूर्वी मिळणाऱ्या लेस चिप्सच्या पॅकेटमधील वेफर्स खाल्ल्यासारखे तरी वाटायचे, पण हल्ली चिप्सची पॅकेटे तर लहान झालीच शिवाय त्यातीच चिप्सचा आकारही लहान झाला. यात आता अनेक कंपन्या चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा जास्त आणि वेफर्स कमी भरत असल्याचे दिसून येते. असे चिप्स पॅकेट बघितल्यानंतर आता बडा पॅकेट छोटा धमाका अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण सोशल मीडियावर सध्या Lay’s या जगप्रसिद्ध वेफर्स ब्रँडचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स संताप व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर एका व्यक्तीने लेसच्या सॉल्टेड वेफर्स पॅकेटचा फोटो शेअर केला आहे, ज्याचे नाव दिव्यांशू काश्यम असे आहे. त्याच्या हातात एक लेसचं वेफर्स पॅकेट दिसतेय. ज्यावर 25 % More असं लिहिलेले दिसतेय. पण, त्या पॅकेटमध्ये 25 % More सोडा, खाण्याइतपत पण वेफर्स नव्हते.

कारण त्याने जेव्हा लेसचं पॅकेट उघडलं तेव्हा त्यात फक्त दोन चिप्स असल्याचे दिसले, जे पाहून त्याचाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पाच रुपयांच्या वेफर्सच्या पॅकेटमध्ये खूप हवा आणि फक्त दोन वेफर्स होते, जे पाहून आता युजर्सही अवाक् झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या चिप्स कंपनीला आपण हवेचेच पैसे देतो, अशी कमेंट काही युजर्स करत आहेत. तर काहीजण पाच रुपयांच्या चिप्सच्या पॅकेटचा कोण व्हिडीओ बनवतो, म्हणत हा प्रमोशनचा भाग असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

Story img Loader