भुत अस्तित्वात आहेत की नाही? हा अनेक शतकांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. जगातील अनेक लोकांचा असा विश्वास आहे की भूत असं काही नसतं, परंतु कधीकधी अशा काही आश्चर्यकारक घटना समोर येतात, ज्या पाहिल्यानंतर आपण भूत खरंच जगात असतात हे पूर्णपणे नाकारू शकत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्ही घाबरून जाल हे मात्र नक्की. हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काळा कुत्रा पांढऱ्या कुत्र्यासोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर, असं लक्षात येतं की काळा कुत्रा अगदी स्पष्टपणे दिसतोय, पण पांढरा कुत्रा थोडा धुसर दिसतोय. पण फारसा अस्पष्ट दिसत नाही. एखाद्या पांढऱ्या सावलीसारखं चित्र दिसतंय असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते ऐकून तुमचे डोळे विस्फारून जातील. खरंतर हा कुत्रा नसून कुत्र्याच्या रुपातलं भूत आहे, असा दावा हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर जेक डीमार्कोला धक्काच बसला
ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जेक डीमार्कोने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सांगितले की, हा व्हिडीओ त्याच्या घराच्या बागेतील आहे, जिथे त्याचा पाळीव कुत्रा एका दुसऱ्या कुत्र्याच्या भुतासोबत खेळताना दिसला. त्यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाळीव कुत्रा भुतासोबत खेळताना कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून मालकाला मोठा धक्का बसला.
आणखी वाचा : आजोबा रॉक्स विदेशी शॉक! फॉरेनरसोबत भर रस्त्यात आजोबांचा जबराट डान्स, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :
व्हिडीओ पाहिल्यानंतर मालक धक्क्यातून बाहेर आला नाही
मेलबर्नचे रहिवासी जेक डीमार्को म्हणतात की, त्यांच्या घराभोवती कुंपण आहे, ज्यामुळे कोणत्याही प्राण्याला घरात प्रवेश करणे शक्य होणार नाही. त्याने व्हिडीओमध्ये फक्त हा कुत्रा पाहिला आहे. जेक या कुत्र्याला शोधत शोधत बागेत गेला मात्र, तिथे कुत्रा तिथे कुठेच नव्हता. त्यांनी या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ पाहिल्याचं सांगितलंय. ही घटना घडली तेव्हा जेक गॅरेजमध्ये सिगारेट ओढत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, ही घटना घडल्यानंतर जेक आणि त्यांची पत्नी नियमितपणे त्यांच्या घराची काळजी घेऊ लागले आहेत.