सध्या सोशल मीडियावर अनेक प्रेमवीरांच्या भयानक स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये हे प्रेमवीर त्यांच्या प्रेयसीला प्रेम पटवून देण्यासाठी नको ते धाडस करताना दिसतात. शिवाय त्यांना स्वतःच्या जीवाचीही पर्वा नसल्याचंही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपणाला जाणवतं. गर्लफ्रेंड पटवण्यासाठी तसंच आपलं तिच्यावर खुप प्रेम आहे हे तिला पटवून देण्यासाठी आजकाल नवीन ट्रेंड सुरु झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- दुर्दैवी : एका पेन्सिलमुळे गमावला चिमुकलीने जीव, भावासोबत अभ्यास करत असतानाच…

ज्यामध्ये अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी विजेच्या खांबावर, पाण्याच्या टाकीवर नाहीतर मोबाईलच्या टॉवरवर चढून जीव देण्याचा प्रयत्न करतात किंवा जीव देण्याची भिती दाखवत मुलींना ब्लॅकमेल करतात. असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका व्यक्तीचा जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो व्हिडीओकॉलवर आपल्या प्रेयसीला आपलं तिच्यावर प्रेम आहे सांगण्यासाठी तो आय लव्ह यू, आय लव्ह यू… असं मोठ्याने ओरडताना दिसतं आहे.

हेही पाहा- Video: काळ आला होता, पण…! काही क्षणाचा विलंब अन् दोघेही झाले असते वाघाची शिकार

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उंच विजेच्या खांबावर चढला आहे. तो हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ कॉलवर बोलत आहे. मोबाईलकडे बघून तो जोरजोरात पूजा आय लव्ह यू… पूजा आय लव्ह यू…असं ओरडतना व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर _itz_sonu_beawar या नावाच्या पेजवरून तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ७१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. दरम्यान, हा एक माथेफिरु असून आपल्या जीवाशी अशा प्रकारे खेळणं अयोग्य असल्याची कमेंट एका युजरने केली आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने ‘तुझा अशा स्टंटमुळे पुजा तुला मिळणार नाहीच पण तुझा जीव मात्र गमावला जाईल’ असं म्हटलं आहे. शिवाय अनेक नेटकरी या व्यक्तीचं वागणं चुकीचं असल्याचं म्हणत आहेत.