Man Comes Out Of Crocodile Mouth Video: पृथ्वीवरील काही भयंकर प्राण्यांची यादी काढली तर त्यामध्ये मगरीचे नाव सुद्धा आवर्जून समाविष्ट करावे लागेल. महाकाय शरीराच्या मगरी ज्या पाणी व जमीन दोन्हीकडे राहू शकतात, काहीही खाऊ शकतात आणि कित्येक वर्षे जगू शकतात यांच्याविषयी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. अक्षरशः मोठमोठ्या प्राण्यांना भांडणात वरचढ ठरलेल्या एका मगरीचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे आजवर रौद्र रूपात बघितलेल्या मगरींविषयीचे समज दूर करणारा असा हा व्हिडीओ आहे. जर तुमचेही हृदय कमजोर असेल किंवा पटकन भीती वाटत असेल तर हा व्हिडीओ जपूनच पाहा.
@earth_animals_pix या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की मगर दिसत आहे. त्यात तिची शेपटी पकडून एक माणूस बसला आहे. समोर तोंडापाशी एक व्यक्ती दिसतेय आणि अचानक हळूहळू मगरींचा जबडा उघडू लागतो आणि त्यातून एक हात बाहेर येतो, या हातात एक बिअरसारखा कॅन असतो तो कॅन समोर उभी असणारी व्यक्ती घेते आणि मग हळूहळू जबडा आणखी मोठा होऊ लागतो त्यातून चक्क एक व्यक्ती बाहेर येताना दिसत आहे. मगरीच्या जबडयातून जिवंत सुटून बाहेर येणारी ही व्यक्ती पाहता अर्थातच कोणालाही धक्का बसू शकतो पण तिथेच तुम्हालाही शंका येईल की ‘बॉस हे काहीतरी भलतंच प्रकरण दिसतंय.’ आधी व्हिडीओ पाहूया आणि मग तुम्हाला वाटतंय ते बरोबर आहे का हे वाचा.
तर मंडळी, तुमच्याही लक्षात आलं असेलच की ही एक लाईफ साईझ म्हणजेच अगदी खरी खुरी वाटावी अशी खेळण्यातील मगर आहे. रोबोट सारखं या मगरीला समोर उभी असणारी व्यक्ती नियंत्रणात ठेवत आहे आणि त्यानुसार तिचा जबडा खाली वर होत आहे. या तांत्रिक गुपितामुळे जिवंत माणूस मगरीच्या जबड्यातून बाहेर आला नाही हे खरं सिद्ध होतं पण ज्या पद्धतीने या मगरीची निर्मिती केली आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. “रोबोट क्रोकोडाईल” असे शीर्षक असलेल्या व्हिडिओला ६ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हे ही वाचा<< इन्फ्लुएन्सर कामिया जानीच्या ‘त्या’ Video वर भाजपकडून अटकेची मागणी; म्हणाले, “पवित्र मंदिरात अशा..”
दरम्यान, नेटकऱ्यांनी मात्र या व्हिडिओवर धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिले की वाह्ह जीव वाचवायच्या आधी तो बिअरचा कॅन वाचवणं महत्वाचं वाटलं यातच सगळं आलं. काहींनी शेपटीकडे बसलेल्या माणसाच्या संयमाचं कौतुक केलं आहे. तुम्हाला हा खोटाच पण अगदी खरा भासावा असा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.