Vande Bharat Express Food Viral Post : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई ते मडगावदरम्यान धावणाऱ्या १९ व्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला १९ जून रोजी हिरवा कंदील दाखवला. या एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा प्रवास अगदी जलद आणि सुखकर होत आहे. त्याशिवाय या गाडीमधील जेवणाबाबतही अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. पण, आता एका प्रवाशाने ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधून प्रवास करताना सध्या मिळणाऱ्या जेवणाचा एक फोटो ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
ट्विटरवर स्वत:ला rail enthusiast म्हणवणारे मुंबईतील हिमांशू मुखर्जी यांनी मडगाव जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या 22230 वंदे भारत एक्स्प्रेस या गाडीमधून प्रवास करताना जे जेवण दिले होते, त्याचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी ट्रेनच्या उद्घाटनाच्या वेळी स्वादिष्ट म्हणून वर्णन केलेल्या जेवणाचा फोटोदेखील शेअर केला आहे. या दोन्ही जेवणांतील फरक त्याने या पोस्टमधून सांगितला आहे.
हेही वाचा : ओला कॅबने प्रवास करताय, मग तुमच्यासोबतही होऊ शकतो असा गैरप्रकार; युजर्सने शेअर केली मुंबईतील ‘ती’ घटना
पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलेय की, उद्घाटनावेळी प्रवाशांना ‘आहुजा कॅटरर्स’चे जेवण मोफत दिले जात होते आणि आता २५० रुपये घेऊनही दगडासारखे कडक झालेले पनीर, थंड जेवण व खारट डाळ दिली जात आहे. ते पुढे असेही म्हणाले की, ते ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधून प्रवास करणारे नेहमीचे प्रवासी आहेत; पण आता जेवणासोबत दिले जाणारे दही आणि सॅनिटायझरदेखील गायब झाले आहे. त्यामुळे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत ते खूप नाराज झाले आहेत.
यावर पुढे त्यांनी रेल्वेला जाब विचारत लिहिलेय की, कृपया मला एक योग्य स्पष्टीकरण द्या- जर तुम्ही आमंत्रित पाहुण्यांना इतके चांगले जेवण देत असाल, तर मग सामान्य प्रवाशांना समान दर्जाचे जेवण का देऊ शकत नाही? अशा सर्व बाबींमुळेच प्रवाशांमध्ये रेल्वेबाबत आधीच वाईट छाप निर्माण झाली आहे.
१ जुलै रोजी पोस्ट केलेल्या या पोस्टला १.२७ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या पोस्टवर एका युजरने घरी बनवलेल्या जेवणाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, म्हणून तो ट्रेनमधून प्रवास करताना नेहमी त्याच्यासोबत घरचे जेवण घेऊन जातो.
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, @RailMinIndia @Central_Railway @KonkanRailway तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही या ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा राखावा. या ट्रेनच्या उदघाटनाच्या वेळी दिलेले जेवण उत्कृष्ट दर्जाचे होते. कृपया ट्रेनच्या कॅटरिंग सर्व्हिसमुळे अन्नाची नासाडी करू नये ही विनंती.
त्यावर तिसऱ्या एका युजरने आपला अनुभव शेअर करत लिहिलेय की, मुंबई सेंट्रल – निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी (तेजस)मध्येही अशीच विदारक अवस्था आहे.
त्यावर एका युजरने लिहिलेय की, होय, ट्रेनमधील अन्न वाया जाते. मी काही दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होतो त्यावेळी जेवणासाठी प्रति व्यक्ती ७०० रुपये आकारले होते पण त्या जेवणाची गुणवत्ता दयनीय होती, जरी मी ट्रेनमध्ये ३० तास घालवले, यावेळी प्रीमियम ट्रेनची डायनॅमिक किंमत+ अन्नाचा दर्जा अजिबात योग्य नव्हता.