विचित्र फूड कॉम्बिनेशन्स तयार करणे हा आज काल ट्रेंडच झाला आहे. आतापर्यंत आपण विचित्र फूड कॉम्बिनेशन्स पाहिले असतील. कधी मँगो पिझ्झा, कधी भेंडी न्यूडल्स आणि पनीर-चॉकलेट डोसापर्यंत अनेक विचित्र पदार्थ आपण आपण पाहिले असतील. विचित्र फूड कॉम्बिनेशन्स तयार करताना लोक ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात काहीच्या काही पदार्थ तयार करतात. हे पदार्थ आरोग्यासाठी किती लाभदायी किंवा हानिकारक आहेत याचा मात्र विचार करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कित्येकदा विक्रेते असे विचित्र पदार्थ तयार करतात जे आपल्याला पचवणे फार कठीण वाटतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फूड व्हिडिओमध्ये असेच काहीही दाखवण्यात आलेले आहे. यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पराठे करताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तुम्ही विचार करत असाल की पराठा पाहून लोक आश्चर्यचकित का झाले असतील? त्याचे कारण आहे पराठा विक्रेताची पराठा करण्याची पद्धत. ज्या पद्धतीने त्याने पराठा तयार केला आहे तो खाण्यासाठी एखाद्याला खूप हिंमत्त दाखवावी लागेल.

स्ट्रीट फूड विक्रेता तुपात तळला पराठा

सोशल मीडियावर @officialsahihaiने व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक स्ट्रीट फूड विक्रेता एका तव्यावर पराठा टाकताना दिसत आहे. त्यानंतर त्याने जवळपास अर्धाकिलो तूप टाकून त्यात पराठा तळला आहे. हे पाहून पराठा तुपामध्ये तरंगत आहे की काय! असेच तुम्हाला वाटेल. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘स्विमिंगवाले दिलखुश पराठे’ असे नाव दिले आहे.

.

हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून नऊ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया देखील मिळत आहे.

हेही वाचा : आधी बीटेक पुन्हा ६ वर्ष नोकरी; अचानक सर्व काही सोडून झाली कॅब ड्रायव्हर! महिलेच्या संघर्षाची कथा ऐकून व्हाल थक्क

पराठा लोकांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले की, ”लोकांना हार्ट अ‍ॅटकने मारायचे आहे का?” दुसऱ्याने सांगितले की, हा पराठा खाल्लानंतर तुम्हाला बायपास सर्जरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. तिसऱ्याने मजेत म्हटले की, ”तूप कमी आहे” तर चौथ्या व्यक्तीने उपाहासात्मक पद्धतीने सांगितले की, ”काका, तूप द्या पराठाला लावून” असे सांगितले. पाचवा व्यक्तीने याला, ”हार्ट अ‍ॅटक पराठा” असे नाव दिले.

हेही वाचा : कचऱ्यापासून असा तयार केला जातो कागद? कधी पाहिले नसेल तर हर्ष गोयंकाने शेअर केलेला व्हिडिओ पाहाच

एका यूजर या पराठयावरून विनोद करताना म्हणाला, ”न्यायाधीश साहेब, मला मत्यू दंड दिला जाईल का?” त्यावर, न्यायधीश म्हणेल, नाही, तुला हा पराठा खावा लागेल.” अनेकांनी या पराठयावर अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटते?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man cooks dangerous paratha internet horrified says instead of giving death penalty feed this paratha watch viral video snk
Show comments