घरामध्ये, एखादी गोष्ट चालत नसेल किंवा सोप्या पद्धतीने करायची असेल तर त्यासाठी आपण घरगुती उपाय किंवा ‘जुगाड’ करत असतो. मात्र सोशल मीडियावर सध्या फिरणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एका माणसाने चक्क थोडक्या गोष्टींचा वापर करून; रस्ता झाडण्याचे काम सोपे, सोईचे आणि कमी कष्टाचे होण्यासाठी एक तुफान शक्कल लढवल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून, हर्ष गोएंका [Harsh Goenka] यांनी, या रस्ता झाडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीने ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूस एका लोखंडी गोलाकार भागावर, चार झाडू एकेकांना बांधून घेतले आहेत, असे आपण पाहू शकतो. गाडी चालवताना, ट्रॅक्टर मागील गोलाकार भाग फिरून, त्यावर लावलेल्या झाडूने, रस्ता सहज झाडाला जाईल; अशा पद्धतीने त्या सर्व गोष्टींची रचना केली आहे. त्यामुळे भलेमोठे रस्ते, फार कष्ट न करता अगदी एका जागी बसून झाडून निघत असल्याचे आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो.

हेही वाचा : बापाने, लेकीसोबत स्टेजवर केला हा गोंडस ‘टुटू’ डान्स! पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच, नेटकऱ्यांचे लक्ष या भन्नाट जुगाडाने वेधून घेतले आहे. इतकी वेगळी आणि उपयुक्त कल्पना पाहून, अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियादेखील दिलेल्या आहेत. त्यापैकी काही मोजक्या प्रतिक्रिया आपण पाहू.

अतिशय मोजक्या वस्तूंचा वापर करूनदेखील, इतकी उपयुक्त वस्तू या माणसाने बनवल्यामुळे नेटकऱ्यांना याबद्दल आश्चर्य आणि कौतुक वाटत आहे.
एकाने, “वाह, असेही काही होऊ शकते याबद्दल माहीतच नव्हते.” असे म्हंटले आहे. दुसऱ्याने, “ही अद्भुत गोष्ट तर फक्त सिमिलीपालमध्येच दिसू शकते. मी इथेच राहायचो..” असे काहीसे लिहिले आहे. “खूप मस्त” अशी तिसऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

हर्ष गोएंका यांनी एक्सच्या माध्यमातून शेअर केलेल्या या व्हिडीओला ‘काटकसरीतून निर्माण झालेला नाविन्यपूर्ण शोध’ [Frugal innovation] असे कॅप्शन दिलेले आहे. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत १०४.४ K इतके व्ह्यूज आणि एक हजारहून अधिक लाईक्ससुद्धा मिळाले आहेत असे आपल्याला दिसते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man created road sweeping machine with very minimal resources x post went viral on social media dha