Tomato Song Viral Video : टोमॅटोचे भाव अचानक वाढले आहे. अनेक राज्यांमध्ये टोमॅटो प्रति किलो १५० रुपयांच्या पार पोहचला आहे. पावसामुळे आवक घटल्याने टोमॅटोच्या किमती वाढल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे अनेकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाल्याचे दिसत आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमतीवरुन ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडत आहे, तर दुसरीकडे इतर सोशल मीडिया अकाउंटवर युजर्स रिल्स व्हिडीओ बनवत आहेत जे आता मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. अशात आता सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने टोमॅटोच्या वाढत्या किमतीवर चक्क एक मजेशीर गाणं तयार केल आहे, जे आता युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. दरवाढीवरील हे गाणं ऐकून तुमचाही मूड एकदम फ्रेश होईल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती टोमॅटो खरेदी करत असून खिशातून १०० रुपये काढून भाजी विक्रेत्याला देत आहे, यानंतर तो त्याच्या तीन मित्रांसोबत हातात भाज्याच्या दोन पिशव्या घेऊन महागड्या टोमॅटोवर गाणं गात नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही नाचत आहेत. त्याच्या डान्स मूव्हमेंट आणि चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन अगदी पाहण्यासारख्या आहेत. यानंतर गाण्याच्या शेवटी तो व्यक्ती रिकाम्या खिशा दाखवत रडण्याचे एक्स्प्रेशन देत आहे. युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.
‘तुम तुम’ या लोकप्रिय तमिळ गाण्याच्या चालीवर हे टोमॅटो साँग तयार करण्यात आले आहे. सांबरापासून पावभाजीपर्यंत जवळपास प्रत्येक भारतीय पदार्थांमध्ये टोमॅटोची गरज असते, पण वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो आता गायब झाला आहे.
हा मजेशीर व्हिडीओ कुशल पवार नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, टोमॅटो साँग… या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. युजर्सना हे गाणे खूप मजेशीर वाटत आहे. या गाण्याच्या माध्यमातून क्रिएटरने सर्वसामान्य लोकांची व्यथा समर्पकपणे मांडली आहे. यामुळे युजर्स त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, आम्हीत शेतातून मोफत टोमॅटो येतात. दुसर्याने लिहिले की, दिल्लीत टोमॅटो १६० रुपये प्रति किलो झाला आहे. सध्या टोमॅटोचे दर काहीही असले तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.
आनंद महिंद्रांना आठवले शाळेतील ‘ते’ दिवस; मजेशीर Video पोस्ट करत म्हणाले, ‘आठवणीत हरवून…’
मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किमती १५० ते १५० रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत. कोलकत्तामध्ये टोमॅटोचेदर सर्वाधिक जास्त म्हणजे १४८ रुपये प्रति किलोवर पोहचला आहे, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा भाव अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये किलोवर पोहचला आहे.