तुम्ही आयफोन वापरकर्ते आहात की अॅण्ड्रॉइड? कोणतेही वापरकर्ते असलात तरीही तुम्ही सध्या व्हायरल होणाऱ्या आयफोनचा ‘हा’ विचित्र व्हिडीओ पाहून चांगलेच हैराण होणार आहात. तर झालेय असे की, सोशल मीडियावर एका इन्फ्ल्यूएन्सरने चक्क आयफोनमध्ये अंडे कुस्करल्याचा एक विचित्र आणि अत्यंत किळसवाणा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इन्स्टाग्रामवर आपल्याला अनेकदा चित्र-विचित्र गोष्टींचे फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळत असतात. मात्र, त्यांपैकी हा व्हिडीओ जरा जास्तच चक्रावून सोडणारा आहे. नेमके असे या व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे ते पाहू. scottsreality_ig नावाच्या अकाउंटद्वारे शेअर केल्या गेलेल्या या व्हिडीओमध्ये एक गृहस्थ सर्वप्रथम एक काळ्या रंगाचा आयफोन घेतो. त्यावर न सोललेले उकडलेले अंडे ठेवतो. त्यावर एक पारदर्शक फोन कव्हर ठेवून, ते उकडलेले अंडे आयफोन आणि त्याच्या कव्हरमध्ये कुस्करून, हातोडीच्या मदतीने कुस्करलेले अंडे संपूर्ण केसमध्ये पसरवतो.
हातोडीने सगळीकडे अंडे पसरवून झाल्यावर पुन्हा बोटाने कव्हर फोनवर थोडे चेपून कॅमेऱ्याच्या मोकळ्या भागातून कुस्कर झालेले अंडे आणि त्याचे कवच बाहेर येऊ देतो. पुढे एका टिश्यू पेपरच्या मदतीने आयफोनचा कॅमेरा स्वच्छ पुसून घेतो आणि फोन सुरू असल्याचे स्क्रीन चालू करून दाखवतो.
असा हा अत्यंत किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहू.
“काही वेडे, वेड्याच्या हॉस्पिटलमधून पळून गेले आहेत. त्यांना कुणी पाहिल्यास कृपया मला संपर्क करा”, असे एकाने लिहिले आहे. “असं अन्न वाया घालवून काय मिळतं? आजकाल व्ह्युज मिळवण्यासाठी लोकं काहीही करत सुटले आहेत”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “त्या आयफोनला कसा वास येत असेल आता शी!”, असे तिसऱ्याने म्हटले आहे. “या सगळ्याचा नेमका काय अर्थ आहे?” चौथ्याने लिहिले आहे. “अन्न वाया घालवताना यांना काहीच वाटत नाही”, असे पाचव्याने म्हटले.
हेही वाचा : बापरे, ‘तंदुरी चिकन’चा बनवला ‘केक’! तरीही Video वर नेटकरी झालेत तूफान खुश; पाहा कारण
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @scottsreality_ig नावाच्या अकाउंटवरून शेअर झालेल्या या व्हिडीओला ३२.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.