Dance Viral Video: जवळपास २२ वर्षांपूर्वी ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तारा सिंग आणि सकिना यांची क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तब्बल २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये या चित्रपटाविषयीची क्रेझ पाहून ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे जेव्हा चित्रपटासाठी पुन्हा प्रदर्शित झाले, तेव्हा ते सिनेमागृहात वाजले तेव्हा लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे नुकताच एका चाहत्याचा चित्रपटगृहात नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ इतका प्रेक्षणीय आहे की तो लोकांची मने जिंकत आहे.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना, डिजिटल क्रिएटर लव सोलंकी रुद्राक्षने लिहिले, ‘आग लगा दी’. व्हिडिओची सुरुवात थिएटरमध्ये गदर 2 चित्रपट पाहण्यापासून होते. ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे वाजताच चित्रपटगृहातील व्यक्ती आपल्या जागेवरून उठतो आणि या मस्त गाण्याच्या तालावर नाचू लागतो. त्या व्यक्तीच्या डान्सवर व्हिडीओमध्ये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही पाहायला मिळतात. अनेक लोक हा क्षण आपल्या स्मार्टफोनवर रेकॉर्ड करतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या व्यक्तीच्या डान्स व्हिडीओने नेटिझन्सचं मन जिंकलं आहे.
येथे पाहा व्हिडीओ
(हे ही वाचा : Video-हृदयस्पर्शी! देशसेवा करून पहिल्यांदाच घरी परतलेल्या सैनिकाचं स्वागत पाहून तुमचाही ऊर अभिमानाने येईल भरून )
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लोकांच्या पसंतीला उतरत आहे. दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओला ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि संख्या अजूनही वाढत आहे. अनेक लोक व्हिडिओवर कमेंट करत त्यांचे मत मांडत आहेत. अनेक लोकांनी हा चित्रपट भावनिक असल्याचे म्हटले आहे.