सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. असे व्हिडीओ पाहून अनेकदा आश्चर्यच वाटतं.

तसंच अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यातले अपघात गंभीर असतात आणि ते पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. पण, काही अपघात नकळत होतात तर काही अपघात लोकांच्या एका लहानशा चुकीमुळेदेखील होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका माणसाच्या मजेमुळे दुसरा माणूस संकटात सापडतो. नेमकं असं घडलं तरी काय, ते जाणून घेऊ या…

Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
Clean up marshal recovery of penalty outside Dadar railway station Mumbai Municipal Corporation action video viral
दादर रेल्वेस्थानकाबाहेर ‘या’ लोकांकडून केली जातेय दंड वसुली; मुंबई पालिकेच्या कारवाईची ही कोणती पद्धत? VIDEO VIRAL
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Shocking video Woman finds worms in chicken woman who ate chicken had larvae in her meal gave up meat after watching
आवडीने चिकन खाताय? अर्ध चिकन खाऊन झाल्यावर महिलेला आतमध्ये काय दिसलं पाहा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

एक चूक पडली महागात

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. या व्हिडीओमध्ये एका माणसाने रस्त्याच्या कडेला आपली बाईक लावली आणि हेल्मेट घालून अचानक रस्त्यावर नाचू लागला. आजूबाजूचं भान न ठेवता तो अगदी आपल्याच धुंदीत डान्स करताना दिसतोय. तेवढ्यात मागून एक बाईक आली आणि समोर डान्स करत असलेल्या माणसाचा अंदाज न आल्यामुळे बाईक माणसाला धडकली आणि बाईकसह दुचाकीस्वार आणि तो माणूस दोघंही खाली कोसळले. खाली कोसळताच डान्स करणारा माणूस उठला आणि दुचाकीस्वाराची मदत करू लागला.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @autohelpermarathi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “मोर उडाला राव” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.३ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हा मोर अचानक कसा काय उडायला लागला”, तर दुसऱ्याने “बाईकवाल्याला दिसला नाही का एवढा मोठा मोर” अशी कमेंट केली; तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “मोरामुळे बाईकवाल्याचं तोंड फुटलं.”

Story img Loader