Cycle Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर कधी, काय व्हायरल होईल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. कोणी कारला हेलिकॉप्टर बनवतो. तर कोणी जुगाड करून विटांपासून कूलर बनवतं. आता अशाच प्रकारचा एक नवा जुगाडू व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच थक्क झाले आहेत. एका तरुणाने देशी जुगाड करून असं काही बनवलं आहे, जे पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या तरुणाने भंगारातील सामानाचा वापर करून पायंडलशिवाय चालणारी सायकल बनवली आहे. तरुणाने या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, ही भन्नाट सायकल कशाप्रकारे बनवली आहे, याबाबत माहिती दिलीय.
तरुणाने बनवलेल्या अनोख्या सायकलला पायडंल, मोटर आणि इंजिन नाही. तरीही ही सायकल पुढे कशी जाते? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. मात्र, तरुणाने इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या व्हिडीओ या जुगाडू सायकलची सर्व माहिती सांगितली आहे. भंगारात पडलेली जुनी सायकल घेतली. तिचा पुढचा भाग जसा होता तसाच घेतला. त्यानंतर वेल्डिंग करून एक चकोर स्ट्रक्टर बनवला. त्यावर कपडा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून बचाव होईल. सायकलला एडजेस्टेबल सीट लावण्यात आलीय. तसंच छोट्या सायकलचे टायरली लावण्यात आले आहेत. व्हिडीओत पाहू शकता की, तरुण पायांच्या मदतीने सायकलला पुढे ढकलतो.
त्यानंतर सायकल आपोआप पुढच्या दिशेनं जाते. हा व्हिडीओ @master_ashishhh नावाच्या यूजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, पायंडलशिवाय चालणारी सायकल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत ६० लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तर ३७ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.