दिल्ली मेट्रो ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. येथे कधी कोणी डान्स करत तर कोणी भांडण करते. रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे व्हिडीओ समोर येत असतात. मेट्रोमध्ये रिल्स तयार करणे आणि डान्स करण्यास मनाई असूनही वारंवार या घटना होताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये एक मुलगा नकली सीटवरून प्रँक करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
नकली सीटवरुन तरुणाने केला मेट्रोमध्ये प्रँक
व्हिडीओमध्ये पाहू शकता की दोन कोचमध्ये एका मुलगा सीटवर बसल्यासारखा दिसतो. पण प्रत्यक्षात तिथे कोणतेही सीट नाही. जवळचमोबाईलमध्ये मग्न असलेली एक तरुणी उभी आहे. थोड्यावेळाने हा यूवक उठतो आणि निघून जातो आणि ती तरुणी बसण्यासाठी मागे वळते. पण तिला कोणतेही सीट तिथे दिसत नाही. घडलेला प्रकारामुळे तिचा गोंधळ होतो. हा मुलगा इतकावेळ इथे कसा बसला होता, येथे तर कोणतीही सीट नाही? असा प्रश्न पडल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. हा मुलगा इतकावेळ सीटवर बसण्याचे नाटक करत होता हे तिच्या लक्षात येते. इंस्टाग्राम व्हायरल भयानी पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यावर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडिया यूजर्सने कमेंट केली
एका सोशल मीडिया यूजर्सने लिहिले, ‘मुलीला वाटले की आता तिला जागा मिळाली आहे, आरामात बसून रील पाहू शकते, परंतु तिच्यासोबत तरप्रँक झाला आहे.’ दुसर्याने लिहिले, ‘मुलाने त्याची सीट बरोबर आणली होती आणि जाताना तो ती घेऊन गेला, त्याचा दोष नाही.”
आणखी एकाने लिहिले, ‘आजकाल लोक त्यांच्या फोनमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना त्यांच्या बाजूची पर्वा नाही.’ दुसर्याने लिहिले, ‘कमीतकमी बसण्यापूर्वी पाहू या, तो मुलगा झाला असता पहिले देखील नसते आणि बसण्याचा प्रयत्न केला असता.”
हेही वाचा – OMG! धगधगत्या ज्वालामुखीवर तरुणीने भाजला पिझ्झा अन् मारला ताव, पाहा व्हिडीओ
दिल्ली मेट्रोमध्ये रील बनवणे, रोमान्स करणे आणि बिकनी परिधान करुन प्रवास करणे यावरून वाद निर्माण झाला आहे. हे थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलली जात आहेत, असे डीएमआरसीच्या वतीने सांगण्यात आले. एवढेच नाही तर रील न बनवण्याबाबत सतत ताकीद दिली जात आहे.