Jugaad Video: सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल हे कोणीच सांगू शकत नाही. कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी जुगाड करून विटापासून कुलर बनवतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाड करून असे काही केले आहे, जे सर्वांनाच आवडले आहे आणि लोकांना त्याचा खूप उपयोगही होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने बोटीत पॅडलने चालणारे वल्हव बसवले आहे. फक्त पॅडल मारून बोट कशी पाण्यावर चालतेय हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
१३ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बोटीत अगदी आरामात बसलेली दिसत आहे. त्याच्या पायाजवळ दोन पेडल्स आहेत, जे तो चालवत आहे. या जुगाड बोटीची विशेष गोष्ट म्हणजे तिला चालवण्यासाठी हात वापरण्याची गरज नाही. फक्त पॅडल फिरवत राहा आणि बोट आपोआप हलू लागेल. ते तयार करण्यासाठी त्या व्यक्तीने आश्चर्यकारक काम केले आहे. त्याने बोटीच्या मागे सायकलची साखळी आणि दोन्ही बाजूला पॅडल लावले. त्याची रचना पाहिल्यास असे दिसते की जणू एखादी व्यक्ती सायकलवर बसून सायकल चालवत आहे.
हेही वाचा – तहानलेल्या कुत्र्याला पाणी पिण्यासाठी महिलेने केली मदत; व्हिडीओ पाहून लोक म्हणतायत, ”दयाळूपणाची…”
हा व्हिडिओ ट्विटरवर मॅसिमो (@Rainmaker1973) नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- कॅनोयसाठी इंटरेस्टिंग प्रोपल्शन सिस्टम (Propulsion system) २३ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ५.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर ७० हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे.
हे जुगाड ते पूर्ण मेहनतीचे कामही अत्यंत आरामशीर आहे. सोशल मीडिया युजर या जुगाडने खूप इंप्रेस होत आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये अनेक कमेंट्स येत आहेत. एकाने लिहिले, ”खुप चांगला आविष्कार. दुसर्याने कमेंट केली आहे , खूप चांगली कल्पना आहे.