Desi Jugaad Viral Video : रस्त्यांवर तुम्हाला वाहनांची नेहमी मोठी वर्दळ पाहायला मिळते. जिकडे पाहावे तिकडे नवीन मॉडेलच्या कार दिसतात. पण, जुगाडू लोक याच कारच्या जुन्या मॉडेल्सपासून काही वेळा असे काही वाहन बनवितात की, जे पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. एवढेच नव्हे, तर वाहन क्षेत्रातील काही जाणकारदेखील जुगाडू लोकांच्या क्रिएटिव्हीटीपासून वेडे होतात. सध्या सोशल मीडियावर एका पठ्ठ्याने जुगाड करून वॅगनआर कारमध्ये असा काही बदल केला आहे की, तो छोट्या टेम्पोतून जाईल इतके सामान आता त्या कारमधून घेऊन नेऊ शकतोय. सध्या या अनोख्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बऱ्याच लोकांना सामानाची ने-आण करण्यासाठी पिकअप कारची आवश्यकता भासते; पण ती विकत घेण्यासाठी नेहमीच्या कारपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. पण, एका व्यक्तीने आपल्या मेंदूचा वापर करून जुगाडपासून चक्क कारचेच पिकअपमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे अनेक जण त्याच्या या क्रिएटिव्हीटीला तोड नाही, असे म्हणत आहेत.

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी करायला लावले ‘हे’ काम, म्हणाले, “२५०० रुपये भर नाही तर…”; पाहा VIDEO

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, Hilux lite सारखी दिसणारी एक कार रस्त्यावरून जात आहे. पण, व्हिडीओ बनविणाऱ्या व्यक्तीला अचानक लक्षात येते की, ही वॅगनआर कार आहे. मग त्याने या कारचा संपूर्ण व्हिडीओ बनवला. सिल्व्हर कलरच्या कारचा पुढचा भाग वॅगनआरचा असून, सामान ठेवण्यासाठी मागे पिकअप कारसारखी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे ते पिकअप वाहनासारखे दिसते. वाहनाच्या मागील बाजूस दुधाचे अनेक मोठे कॅन ठेवण्यात आले आहेत.

७०० रुपयांना थार मागणारा चिमुकला थेट पोहचला कारखान्यात; आनंद महिंद्रांनी Video केला शेअर, म्हणाले…

हा व्हिडीओ @bunnypunia या इन्स्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, वॅगनआर : फॅमिली कार, पहिली कार, ओला आणि उबेर! आज सकाळी पंचकुला-सहारनपूर महामार्गावर दिसली. काय जुगाड आहे, नाही का? हा रील व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि शेकडो युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले – शेवटी SUZUKI Hilux बाजारात आली आहे. दुसऱ्याने लिहिले की, हिलक्सची धाकटी बहीण. अनेकांना व्यक्तीचा हा जुगाड फार आवडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man did jugaad to convert wagonr into pickup van shocking vehicle modification see desi jugaad viral video sjr