आपण भारतीय जुगाड वापरून दररोज मजेदार गोष्टी तयार करण्यात हुशार आहोत. यामुळेच आपली कलाकृती पाहून मोठमोठे दिग्गज सुद्धा क्षणभर थक्क होतात. कारण आपण आपल्या जुगाडू कल्पनेने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. नुकताच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बघा. एका व्यक्तीने स्वतःसाठी कशी पद्धतीने जुगाड करत स्पेशल सीट बनवलीय.

ट्रेनमधली गर्दी याचं चित्र सर्वांनाच माहित आहे. इथल्या जनरल कोचचं सोडा, रिझर्व्हेशनच्या डब्यातही लोकांना बसायला जागा मिळत नाही… पण हल्ली समोर आलेला व्हिडीओ तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल. कारण इथं एका व्यक्तीनं आपला अतरंगी जुगाड वापरून खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये स्वतःसाठी जागा मिळवली. जर तुम्ही या समस्येत कधी अडकलात तर तुम्हाला हा जुगाड खूपच उपयोगाचा ठरू शकणार आहे. एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ट्रेनच्या डब्यातील सर्व जागा भरल्या आहेत. हा डब्बा इतका खचाकच भरलाय की व्हिडीओमधल्या व्यक्तीला बसण्यासाठी सुद्धा जागा उरली नाही, अशा स्थितीत त्या व्यक्तीने एक जुगाड वापरून इतक्या गर्दीतही जागा मिळवलीय. या व्यक्तीने एक चादर घेतली आणि या चादरीचे एक टोक एका सीटच्या कोपऱ्याला बांधली आणि दुसरे टोक समोरच्या सीटच्या बांधले. दोन्ही सीटच्या मधोमध चादरीने जुगाड करून या पठ्ठ्याने स्वतःसाठीची स्पेशल सीट बनवली. या व्यक्तीचा जुगाड पाहून तुम्हालाही समजले असेल की आपण भारतीय जुगाडातून काहीही करू शकतो. पण कधी कधी हे जुगाड अपयशी ठरले की मात्र लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. असाच हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या हुशार पोपटापुढे माणूसही फिका पडेल, पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

जुगाडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूपच आवडला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘कोणतेही काम करण्यासाठी अडचणी येत असलीतल आम्हा भारतीयांच्या मनात नेहमीच कोणता ना कोणता जुगाड हा असतोच. याशिवाय इतरही अनेक यूजर्स आहेत ज्यांनी व्हिडीओवर कमेंट करून या व्यक्तीचे कौतुक केले. पण पुढे जे घडलं ते फारच रंजक आहे.


मोठ्या हुशारीने या व्यक्तीने जुगाड करत ट्रेनमध्ये स्वतःसाठी जागा बनवली खरी…पण त्याला जुगाड फार काळ चालू शकला नाही. जसाच हा व्यक्ती या चादरीत बसतो तसाच तो वरून खाली पडतो. हे पाहून तिथल्या प्रवाशांना देखील हसू आवरता आलं नाही.

आणखी वाचा : बर्फाळ जंगलात दोन जण वर्कआऊट करत होते, अचानक मागून अस्वल आला… पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ बघायला इतका मजेशीर आहे की बघताच तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ memes.bks नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘इतका जुगाड पण चांगला नाही भाऊ.’ एका यूजरने कमेंट केली आहे की, “रात्री झोपताना तुम्ही एखाद्यावर पडलात तर बरीच धुलाई होईल.” दुसरी व्यक्ती लिहिते, ‘भाईला जुगाड पुढच्या स्तरावर न्यायचा होता.”

Story img Loader