आजकाल कोणाच्याही आयुष्याचा भरवसा नसतो म्हणतात हे खरंय. असाच एक प्रकार नुकताच मध्य प्रदेशमध्ये घडला. गुरूवारी देशभरात सर्वांनी जड अंत:करणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. परंतु गणपती विसर्जनादरम्यान नाचताना एका 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला.
विसर्जनादरम्यान नागिन डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरूण आणि अन्य काही जण नागिन डान्स करताना दिसत आहेत. नाचतानाच एकदम त्या तरूणाला कार्डिअॅक अरेस्टचा झटका आणि तो तरूण जमिनीवर कोसळला. गुरूचरण ठाकूर असं या तरूणाचं नाव आहे. सुरूवातीला त्याच्या सोबत असलेल्यांना तो खाली पडलेला हा त्याच्या नाचातलाच भाग असल्याचं जाणवतं. परंतु त्यानंतरही तो उठत नसल्यानं अन्य लोकांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.