Shocking Accident CCTV Video Viral : मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. तसंच रस्ते चिकट झाल्याने वाहने स्लिप होऊन अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. अशातच मंगलोरमध्ये २१ वर्षीय तरुणाचा दुचाकी स्लिप झाल्याने जागीच मृत्यू झाला. दुचाकी रस्त्यावरून घसरल्यानंतर ती थेट खांबाला जाऊन धडकली आणि त्या तरुणाला गंभीर दुखापत झाली.
दुचाकीची खांबाला जोरदार धडक बसल्याने त्या तरुणाला जीव गमवावा लागला. मोहम्मद नशाथ असं मृत तरुणाचं नाव आहे. मोहम्मद उप्पला येथील रहिवासी होता. तसंच तो महाविद्यालयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
इथे पाहा थरारक व्हिडीओ
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहू शकता की, दुचाकीस्वार रस्त्यावरून वेगाने दुचाकी चालवत असताना वाहन स्लिप झाल्यावर त्याचा तोल जातो आणि समोरच्या खांबाला तो धडकतो. ही धडक इतकी जोरदार असते की त्याच्या डोक्यावरील हेल्मेटही बाहेर फेकलं जातं. दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी तो वाहनचालक दुचाकी रस्त्यावरून क्रॉस करत असतो. पण दुर्देवाने त्याला अपघाताला सामोरं जावं लागतं आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू होतो.