कोंबड्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा प्राण गेल्याचं तुम्हाला सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तसं कोंबड्याचा हल्ला प्राणघातक मानला जात नाही. मात्र, हाच कोंबडा एका व्यक्तीच्या मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयर्लंडमधील एका व्यक्तीवर अमेरिकन जातीच्या कोंबड्याने अशा प्रकारे हल्ला केला की, त्यामुळे त्या व्यक्तीचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते. अशातच हृदयविकाराच्या झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मागील वर्षी घडली होती. आता त्या घटनेबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे.

कोंबड्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती आयर्लंडमधील असून त्या व्यक्तीचे नाव जॅस्पर क्रॉस असे सांगण्यात आले आहे. या व्यक्तीवर ब्रह्मा कोंबडी जातीच्या अमेरिकन कोंबड्याने हल्ला केला होता. याबाबत गेल्या वर्षी एक समिती स्थापन करण्यात आली होती, ज्यामध्ये आता काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुमारे २५ ते ३० मिनिटे पीसीआर देण्यात आला होती तरीही त्याला वाचवण्यात अपयश आलं आहे.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच

हेही पाहा- चहा आणि ब्रेड खायला तुम्हालाही आवडतं? तर ब्रेड बनवतानाचा ‘हा’ किळसवाणा Video एकदा पाहाच

या प्रकरणात, द आयरिश एक्झामिनरने आता न्यायालयीन चौकशीचा एक अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, कोंबड्याच्या हल्ल्यानंतर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. रिपोर्टनुसार, जॅस्पर क्रॉसच्या मृत्यूचा साक्षीदार आणि जॅस्परचा शेजारी कोरी ओ’कीफे याने सांगितलं की, कोंबड्याच्या हल्ल्यानंतर तो ओरडत होता, शिवाय त्याचा पाय रक्ताने माखलेला दिसला. त्याच्या पायातून सतत रक्तस्त्राव होत होता.

हेही वाचा- Viral News : ऑनलाईन शॉपिंगमुळे महिलेची फसवणूक, १२ हजारांचा टूथ ब्रश मागवला आणि…

त्याला CPR देण्यात आला होता पण रुग्णवाहिका उशिराने आल्याने जॅस्परचा मृत्यू झाला. तपासादरम्यान डॉक्टर रमजान शतवान यांनी दावा केला की जॅस्परचा मृत्यू हृदयाच्या अनियमित ठोक्यामुळे झाला. मात्र, यापूर्वीही अमेरिकन जातीच्या कोंबड्याने लोकांवर हल्ला केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.