मोबाइल ही गरज नसून व्यसन झाले. मोबाइलच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत वारंवार चेतावणी दिली जाते. विशेषत: रस्ता किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडताना मोबाइल वापर नये अशी चेतावणी वांरवार देऊनही लोक पुन्हा पुन्हा तीच चूक करताना दिसतात. अशाच निष्काळजीपणामुळे एका तरुण ब्युनोस आयर्समध्ये एका वेगवान ट्रेनच्या समोर आला होता, ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घडनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

डेलीमेलने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊ रेल्वे रुळ ओलांडत आहे. तो मोबाइल पाहण्यात इतका हरवला आहे की, रुळावरून धावणाऱ्या रेल्वेकडे त्याचे लक्ष जात नाही आणि तो तसाच चाल रेल्वे रुळावर जातो जोपर्यंत त्याच्या लक्षात येते की आपण तो रुळावर उभा आहे तोपर्यंत ट्रेन त्याच्या खूप जवळ पोहचते. तो ट्रेनकडे पाहताक्षणी एक पाऊल मागे घेतो. ट्रेन त्याच्या जवळून गेल्यानंतर तो धक्का बसून तो जमिनीवर पडतो आणि त्याचा फोन त्याच्या हातातून खाली पडतो. व्हिडीओमध्ये ट्रेन थांबलेली दिसत आहे आणि लोक तो व्यक्ती ठीक आहे का याची विचारपूस करताना दिसत आहे.

dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर अंकिताने सांगितला किस्सा, म्हणाली…
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
baba siddique firing
Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन; ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे: “त्यांच्या फोनमुळे विचलित झालेला एक प्रवासी सकाळी ६:२८ वाजता ब्युनोस आयर्समध्ये रेल्वे ट्रॅक ओलांडत होता तेव्हा त्यांनी येणाऱ्या ट्रेनची धडक थोडक्यात टाळली. त्याने शेवटच्या क्षणी मागे पाऊल ठेवले ट्रेनचा त्याला धक्का बसला आणि त्यांच्या हातातून फोन आणि तो जमिनीवर पडला. ”

हेहा वाचा –“बाईपण भारी देवा! इतरांसाठी जगताना स्वत:ला विसरू नका,” कास पठारला भेट देणाऱ्या महिलांचा Video Viral

व्हायरल व्हिडिओ पहा:

या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या. काही दर्शक फुटेज पाहून हादरले, तर काहींनी प्रवासी किती भाग्यवान आहे यावर कमेंट केली. काही लोकांनी प्रवाशांच्या मागे उभ्या असलेल्या महिलेवर टीका केली आणि असा दावा केला की, “ती जवळ येत असलेल्या ट्रेनबद्दल त्या व्यक्तीला सावध करण्यात अयशस्वी ठरली.”

हेही वाचा –“हे कसं शक्य आहे?”, गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या शिखरावर पोहचला श्वान, पण कसा? पॅराग्लायडरने शेअर केलेला Video Viral

एका यूजरने लिहिले की, “त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेने तो ठीक आहे की नाही हे तपासण्याची तसदी घेतली नाही.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “ती महिला त्याच्यापर्यंत का पोहोचली नाही किंवा त्याला थांबण्यासाठी ओरडत का नाही?” तिसरा वापरकर्ता म्हणाला, “माफ करा, पण तुमच्या फोनवर व्यस्त असण्यामुळे हेच घडणार होते.”