गुटखा ही आरोग्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट असली तरी, एका व्यक्तीने गुटख्याचा अशा प्रकारे वापर केला की लोक त्याचे कौतुक करत आहेत. या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : २४ वर्षे बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या पत्नीने केलं दुसरं लग्न, मुलगी करते आता हे काम

समांथाचे सुंदर चित्र काढले
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने गुटख्याचा वापर करून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे अतिशय सुंदर चित्र काढले आहे. या व्हिडिओमध्ये हा तरुण विमल तंबाखूचा वापर करून एक अप्रतिम चित्र बनवताना दिसत आहे.

आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’

आणखी वाचा : ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप झाल्याचा अक्षय कुमारला बसला फटका, ‘धूम ४’ मधून अक्कीचा पत्ता कट?

गुटख्याचा उत्तम वापर
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्याने आधी पाण्यात तंबाखू मिसळली आणि नंतर बोटाने कागदावर पेंटिंग बनवले. लोकांना हे चित्र खूप आवडले आहे. हे पाहिल्यानंतर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या गुटख्याचा हा उत्तम वापर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, अशा अनेक कमेंट त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केला आहेत.

आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट

हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजय देवगणचा गुटखा थुंकतानाचा फोटो काढणे ही विमलला सर्वोत्तम श्रद्धांजली ठरली असती’, असे एकनेटरी म्हणाला. “बोलो जुबान केसरी”, अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केली आहे. तर तिथे कमेंट करताना एक नेटकरी म्हणाला, यूजरने लिहिले की, “गुटखे वाली हसीना.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man draw actress samantha painting with vimal gutkha tobacco best use as man makes tobacco painting dcp