जर आपण दुसऱ्यांचे चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला तर हे जग चांगले होईल. तुम्ही दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही आनंद होईल. अजूनही आपल्या जगात असे लोक आहेत हे जाणून घेऊन तुम्हाला नक्कीच आनंद होईल. सोशल मिडियावर आपण कित्येक व्हिडिओ पाहत असतो ज्यामध्ये काही चांगले लोक दुसऱ्यांची मदत करताना दिसतात किंवा दुखी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते आहे की रस्त्यावर वाहतूक रहदारीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्या चेहऱ्यावर एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हसू उमटले. या व्यक्तीने नक्की अशी काय जादू केली की वाहतूक पोलिसाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. चला तर मग जाणून घेऊ या…या व्हायरल व्हिडिओबाबत
हा व्हिडिओ केरळ पोलिसांनी @TheKeralaPolice यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शिमलाल नावाच्या कलाकाराने रेकॉर्ड केले होते. व्हिडिओमध्ये दिसते आहे की रस्त्याच्या मधोमध उभे राहून एक वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करत आहे. हे दृश्यपाहून कलाकार कशाप्रकारे त्या वाहतूक पोलिसाचे चित्र रेखाटतो आहे हे या व्हिडिओत पुढे दिसत आहे. चित्र पुर्ण झाल्यानंतर कलाकार ते चित्र वाहूतक पोलिसांना देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वाहतूक पोलिस अधिकारी आनंदी होतो आणि कलाकाराचे आभार व्यक्त करतो.
हेही वाचा : तब्बल ५०० दिवस अंघोळ न करता २३० फुट खोल गुहेत राहिली महिला! पण का? जाणून घ्या
हा व्हिडिओ आतापर्यंत ४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लोकांनी या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहून कलाकाराचे कौतूक केले जाते आहे. एकाने लिहिले की, वाहूतक पोलिस कडक उन्हाळा असो, पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी असो प्रत्येक ऋतूमध्ये ते आपल्या कर्तव्य जबाबदारीने पार पाडतात त्यामुळे त्यांच्या कामाचे नेहमीच कौतूक केले पाहिजे.