रामायनामध्ये गर्विष्ठ रावनाला पाहून तुम्हाला नक्कीच राग आला असेल. मात्र तुम्हाला पोट धरून हसवले अशा रावनाच्या वेशातील एका व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रावनाच्या वेशातील व्यक्तीने हरयाणवी गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

@GaurangBhardwa1 या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रावनाच्या वेशातील एक व्यक्ती ‘५२ गज का दामन’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर ही व्यक्ती नाचत आहे. या व्यक्तीने गाण्यावर खूपच छान नृत्यू केले आहे. यामध्ये त्याच्यासमवेत जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली एक व्यक्ती देखील नृत्य करत आहे. रावनाच्या वेशातील या व्यक्तीने आपल्या नृत्याने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

(Viral : तेल काढण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट युक्ती, बर्फाचा गोळा तेलात टाकला अन बघा काय झाले..)

इनको भी आदिपुरुष मे..

रावनाच्या वेशातील या व्यक्तीच्या नृत्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. अलिकडेच अभिनेता प्रभास आणि सैफ अलिखानचा आदिपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना हा टिझर काही खास आवडला नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी चित्रपटात रावनाचे पात्र निभवणाऱ्या सैफवर टीका केली आहे. चित्रपट ट्रोल होत आहे.

या पार्श्वभूमीवर रावनाच्या वेशातील या व्यक्तीला आदिपुरुषमध्ये टाका अशी मागणी एका युजरने केली आहे. सैफच्या ऐवजी या व्यक्तीला चित्रपटात रावन करा, अशी मागणी युजरने केली. आदिपुरुषातील रावनापेक्षा हा रावन चांगला असल्याचेही एका युजरने लिहिले आहे. व्हिडिओला ५५ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून लोकांना पोट धरून हसवत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dressed as raavan dancing on haryanvi song video viral ssb