Man Drilled Hole In His Own Skull: कुठल्याही गोष्टीची धुंदी, नशा ही वाईटच! कारण यामुळे तुमच्या एकूणच आयुष्यावर भावनिक, शारीरिक परिणाम होऊ शकतो. आजवर आपण व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेकांबाबत ऐकले असेल पण सध्या चर्चेत असलेल्या व्यक्तीने नशेत वाहून जाण्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार एका माणसाने स्वतःच्या कवटीत एक छिद्र पाडल्याचे समजत आहे. असे करून त्याला सतत नशेत धुंद राहता येईल, असा त्याचा विश्वास होता. जो मेलेन असे या व्यक्तीचे नाव असून १९६० च्या दशकात बार्ट ह्यूजेस नावाच्या डच व्यक्तीकडून त्याने ट्रेपनेशन म्हणून ओळखल्या जाणार्या प्राचीन प्रक्रियेबद्दल ऐकले होते.
मेलेनने एकदा किंवा दोनदा नव्हे तर तीनदा ड्रिलने स्वतःच्या कवटीला छिद्र पाडून घेतले आहे. मेलेनने VICE ला सांगितले, १९६७ मध्ये त्याने पहिला प्रयत्न केला. “त्या वेळी, मी गरीब होतो, आणि मला इलेक्ट्रिक ड्रिल नक्कीच परवडत नव्हते, म्हणून मी सर्जिकल इन्स्ट्रुमेंटच्या दुकानातून हॅण्ड ट्रेपन विकत घेतले. हे अवघड होते. आतून वाइनची बाटली उघडण्यासारखी ही प्रक्रिया होती, मी त्या वेळी नशेतच होतो, त्याशिवाय हे शक्य होईल असे मला वाटत नव्हते पण नशेत असतानाही हे शक्य झाले नाही.”
यानंतर दुसऱ्या प्रयत्नांविषयी बोलताना तो सांगतो की, “मी दुसऱ्यांदा ट्रेपॅन बाहेर काढताना एक प्रकारचा ‘बुडबुड्यांसारखा’ आवाज आला, मला वाटले की मी तेव्हा छिद्र पाडले पण तेव्हाही ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. अखेरीस १९७० मध्ये त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला आणि तेव्हा त्याचा हा जीवघेणा प्रयोग पूर्ण झाला.”
या प्रक्रियेबद्दल तो सांगतो की, “सर्व प्रक्रियेसाठी अर्धा तास लागला, मला छान वाटत होते परंतु नंतर माझ्या लक्षात आले की एक तासाने माझे शरीर वजन कमी झाल्याप्रमाणे हलके वाटत होते. मेलेनने त्याच्या ‘बोर होल’ या पुस्तकात कायमस्वरूपी नशेत धुंद राहण्यासाठी डोक्यात एक छिद्र कसे ड्रिल केले याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे.
हे ही वाचा<< बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने मागितली… नवरीच्या कुटुंबाने कपडे फाटेपर्यंत धू धू धुतला, घडलं काय?
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, असे प्रयत्न चुकूनही करू नयेत. अशा पद्धतीच्या हट्टामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो.