Shocking Video: माणसांचं आणि श्वानांचं नातं अगदी खास असतं. निष्ठावंत प्राणी म्हणून श्वानाची ओळख आहे. तसंच श्वानांचं पालकत्व स्वीकारलेली लोकंही त्यांना खूप जीव लावतात. त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. पण, या कलियुगात अशीही लोक आहेत जी प्राण्यांवर मालकी गाजवतात आणि स्वत:ला हवं तसं त्यांना वागतात. मग ते त्यांच्या जीवाची पर्वादेखील करत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक माणूस श्वानांच्या जीवाशी खेळताना दिसतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बंगळूरूच्या कल्याणनगर भागात एक माणूस त्याच्या कारच्या छतावर तीन श्वान घेऊन फिरताना दिसला. गाडीच्या छतावर श्वान ठेवत त्याने गाडी चालवली. एका वाहनचालकाने या घटनेबाबत विचारणा केली असता, वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने अपमानास्पद प्रतिक्रिया दिली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Image of a person crossing the road while looking at their mobile phone or a related graphic
Viral Video : मोबाइल पाहत रस्ता ओलांडणं पडलं महागात, दुचाकीवरून आलेल्या पोलिसाने लगावली कानशिलात अन् तरुण…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
How should a driver board an ST bus the driver demonstrated Lalpari new video goes viral netizens mock it
चालकाने एसटी बसमध्ये कसे चढावे? पुन्हा एकदा चालकाने दाखवलं प्रात्यक्षिक; लालपरी’चा नवा Video Viral, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Domestic Violence Against Men
Domestic Violence : “ती माझ्या भावाला बेडरूमध्येही येऊ देत नव्हती”, तरुणीचा व्हिडिओ व्हायरल; वहिनीवर केले गंभीर आरोप

कारचालकाने मोटारचालकास शिवीगाळ केली आणि तीन श्वानांना छतावर उभे करून तो आपली कार रस्त्यावर चालवत राहिला. दोन वाहनचालकांमधील हा संवाद या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. व्हिडीओमध्ये एक मोटारचालक आपले वाहन कारच्या शेजारी थांबवून कारच्या छतावर ठेवलेल्या श्वानांबरोबर गाडी चालवण्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसला. “माफ करा, पण हे सुरक्षित नाही”, असं मोटारचालक म्हणाला. त्याला भररस्त्यात असं सांगितलं म्हणून कारचालकाने त्यालाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा… त्यांना मोह आवरला नाही अन्…, भर कॉन्सर्टमध्ये कपलने केलं किस, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO होतोय VIRAL

“माझ्या कारचा नंबर आणि सर्व काही घे”, असं म्हणत त्याने मोटारचालकाला शिवीगाळ केली. या सगळ्यानंतरही श्वानांना खाली उतरवून कारच्या आत सुरक्षितपणे घेऊन जाण्याऐवजी, त्या माणसाने रस्त्यावर तशीच कार चालवणं सुरू ठेवलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @Chethan_Surya_S या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “छतावर तीन श्वानांसह कार सुमारे दोन किमी चालवली गेली. ही घटना ३ डिसेंबरच्या रात्री घडली. श्वानांना पडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना कोणतीही दोरी, हार्नेस किंवा साखळी बांधलेली नव्हती. विशेष म्हणजे मोठमोठ्याने गाणी वाजवत कार चालवली जात होती. कारच्या मागे प्रेस लेबल होतं, तसंच ‘हरीला जोखीम आवडते’ असं लिहिलं होतं.”

अनेक इंटरनेट युजर्सने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून पोलिसांचे लक्ष वेधले. नेटकऱ्यांनी पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि त्याच्या छतावर तीन निष्पाप जीवांसह कार चालवणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची विनंती केली. व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल होताच, बेंगळुरू शहर पोलिसांनी X वर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पोस्टमध्ये पोलिस पथकाने लिहिले की, त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिस ठाण्याला दिली आहे, जिथे कार दिसली होती.

हेही वाचा… “अरे घूस, काही नाही करत”, मित्राच्या सांगण्यावर आत गेला, पण बैलाच्या तावडीत सापडला; VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…

u

“आम्ही आवश्यक कारवाईसाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कळवले आहे”, शहर पोलिसांच्या अधिकृत आणि मुख्य X (पूर्वीचे ट्विटर) हँडलने पोलिस उपायुक्त, पूर्व विभाग आणि बनासवाडी पोलिस ठाण्याला टॅग करत लिहिले आहे.

अटक झाली

घटनेच्या संदर्भात एका अपडेटमध्ये त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती आणि त्याची ओळख हरीश नावाच्या हेअरस्टायलिस्ट म्हणून करण्यात आली होती, ज्याने बनावट “प्रेस” लेबल लावून आपली कार चालवली होती.

बनासवाडी पोलिसांनी हरीश विरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 351 (2) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला, टाइम्स ऑफ इंडियाने नोंदवले की, पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक करण्यासाठी नंबर प्लेटवरून कारचा नोंदणीकृत पत्ता शोधून काढला. तसेच, पुढील तपास सुरू असल्याचे सांगून पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले आहे.

Story img Loader