Man Earns Money Helping People Viral Video : सध्या पैसा कोणाला नको आहे. अशात सगळेच जण पैसे कमावण्याची संधी शोधत असतात. करोनाचा भीषण काळ पाहिल्यानंतर आता सगळ्यांनाच नोकरी आणि व्यवसायाची गरज आहे. ढासळलेली अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी सगळेच कामाच्या शोधात आहेत. अशाच एका माणसाने परिस्थिती पाहून माणूसकी आणि पैसा दोन्ही कमवण्याची एक वेगळी शक्कल लढवलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये हा माणूस पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहत असलेला रस्ता ओलांडण्यासाठी लोकांना मदतही करतोय आणि सोबतच त्या बदल्यात पैसाही कमवतोय. वाचून तुम्हाला नवल वाटलं असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावरून पावसाचे पाणी ओंसडून वाहत आहे. तर रस्त्याच्या एक कडेला निळा टी-शर्ट आणि अनवाणी असलेला माणूस लोकांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी लोकांना मदत करतोय. एका पुश कार्टमध्ये लोकांना बसवून तो पुश कार्ट ढकलत रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला नेताना दिसत आहे. या फुटेजमध्ये पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक गाड्याही वेगाने येताना दिसत आहेत. लोकांना रस्त्याच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला नेणारा हा माणूस स्वतः मात्र अनवाणी चालत असताना दिसतोय. आपत्ती काळातही लोकांची गरज ओळखून या पठ्ठ्यानं पैसा कमवण्याची ही शक्कल लढवत आपलं पोट भरतोय.

आणखी वाचा : ‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO

करोना काळात नोकरी गमावून बसलेल्या लोकांसाठी हा व्हिडीओ सकारात्मक उर्जा देणारा ठरलाय. हा व्हिडीओ पाहून नकारात्मक विचारांनी ग्रासलेल्या लोकांना पुन्हा नव्याने दमाने उभं राहण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय. हा व्हिडीओ रेडीट या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलाय. BAlfonzo नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ६२ हजारांपेक्षा जास्त अपवोट्स मिळाले आहेत तर ९२६ जणांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत आपल्या भावना शेअर केल्या आहेत. गैरसोयीच्या वेळी पैसे कमवण्यासाठीची अशी आयडिया, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणकी वाचा : सापाला फक्त माणूसच नव्हे तर चिंपांझीं सुद्धा घाबरतात, VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. “व्यवसायाचा पहिला नियम: गरज शोधा आणि ती भरून काढा,” असं एका यूजरने कमेंट करताना लिहिलं. “एखाद्याला मदतीचा हात देण्यासाठी पैसे देण्यास पात्र होण्यासाठी हे पुरेसे पाणी आहे. खूप छान,” असं देखील काही यूजर्सनी म्हटलंय. “तुम्ही महागड्या जॉर्डनची जोडी घातली असेल, किंवा कदाचित ऑफिसला जाताना काही छान ड्रेस शूजमध्ये असाल, तर हे 100% फायदेशीर आहे,” असं आणखी एका दुसऱ्याने लिहिले. “मी त्याच्या उद्यमशीलतेचे कौतुक करतो,” असं एका यूजरने खिल्ली उडवत कमेंट केली आहे.