सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, ज्यावर एखादी व्यक्ती काही दिवसात इतकी लोकप्रिय होऊ शकते की तो सेलिब्रिटी बनतो. तुम्ही अनेकांना रातोरात फेमस बनताना पाहिले असेल. जरी काही लोक यासाठी अशा गोष्टी करतात, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजीत मिरचीचे दोन ते चार तुकडे टाकले तर खाणे कठीण होते, ही व्यक्ती याच मिरची पोटभर खाते आहे. कधी हिरवी तर कधी लाल मिरची एवढेच नाही तर हा तरुण कच्च्या भाज्याही खातो. त्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात अश्रू येतील, पण या तरुणाला काही फरक पडत नाही.

प्रसिद्धीसाठी काहीही..

इन्स्टाग्राम पेजवर त्याने याआधीही विचित्र गोष्टी खाण्याचे अनेक व्हिडिओ टाकले असले तरी हा व्हिडिओ सर्वाधिक पाहिला गेलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण हातात हिरव्या मिरचीचा गुच्छ घेतो आणि खायला लागतो. प्रचंड तिखट लागत असून डोळ्यातून पाणी येत असूनही तो काही वेळात सर्व मिरच्या खातो. हा व्हिडिओ पाहिल्यास तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – समुद्र किनारी तरुणाच्या पायात शिरले किडे; Video पाहून वाळूत बसण्याआधी नक्की विचार कराल

इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man eats raw chillies posts video on social media man eats green and red chillie for likes trending srk