प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आपलं ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम आहे, त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्याजोगा दुसरा सुंदर अनुभव असूच शकत नाही. पोलो आणि त्याची प्रेयसी मिशेलही या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते. सुखी संसाराची स्वप्ने या दोघांनी रंगवली होती. पण लग्नाच्या दोन आठवड्यापूर्वीच पोलोचा हात सोडून मिशेल त्याच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानं लग्नाच्या काही दिवस आधीच तिचा मृत्यू झाला. ती सोडून गेल्यानंतर पोलोनं एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ती भावनिक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

पोलो आणि मिशेल शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण काही वर्षांपूर्वीच मिशेलला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. तिच्यावर उपचारही करण्यात आले. ती या सगळ्यातून सावरली. पुढे या दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. लग्नासाठी या दोघांनी खरेदीही केली. लग्नाची पूर्ण तयारीही झाली होती; पण लग्नाच्या दोन आठवड्यापूर्वीच मिशेलचा मृत्यू झाला. पोलोनं तिचा वेडिंग गाऊनमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या लग्नासाठी तिने तो खरेदी केला होता. तिचा फोटो शेअर करून पोलोनं तिला फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली आहे.

Story img Loader