मुलांसाठी पालक हा मोठा आधार असतात असे म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. तुमची प्रगती पाहून त्यांना आनंद होतो. मुलांच्या आवडी- निवडीमध्ये आनंद मानणारे, मुलांचे मन समजून घेणारे पालक प्रत्येकाला हवे असतात. मुलांना पाठिंबा देण्यासाठी पालक नेहमी तत्पर असतात. असा काहीसा प्रकार या मुलांसह घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसह नाचण्यासाठी हे वडील आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहे. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्हाला हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नक्कीच आवडेल.

बाप असावा तर असा!
हा व्हायरल झालेला व्हिडिओ साधना नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये साधना प्रणव हेगडे नावाच्या व्यक्तीसह नाचताना दिसत आहे. हे दोघे एका पार्कमध्ये रीलचे रेकॉर्डिंग करत होते. अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या माणसाने त्यांना पाहिले. त्याने त्या दोघांना विचारले की, त्याची मुले त्यांच्यासह नाचू शकतात का? साधना आणि प्रणवने लगेच होकार दिला. या व्यक्तीची मुलं आधी थोडा संकोच करत होती. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. वडिलांनी पाठिंबा दिल्यानंतर जेव्हा त्याची मुले नाचू लागताता ते पाहून वडिलांना फार आनंद झाला.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Daughter Made Shirt For Dad
‘फक्त लाडक्या बाबांसाठी…’ लेकीने शिवला खास शर्ट; ‘तो ‘खास मेसेज पाहून भारावून जाईल मन; पाहा रिक्षाचालकाचा Viral Video
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO

हेही वाचा – आधी बीटेक पुन्हा ६ वर्ष नोकरी; अचानक सर्व काही सोडून झाली कॅब ड्रायव्हर! महिलेच्या संघर्षाची कथा ऐकून व्हाल थक्क

“जगात सर्वोत्तम नावाची कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही फक्त तुम्हाला हवे ते करा,” असे या मुलांचे वडील त्यांना सांगत आहेत.

मुलांना नाचायला प्रोत्साहन देणारा ‘सुपर बाबा’

साधनाने आपला अनपेक्षित अनुभव सर्वांना सांगितला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले होते, ”जेव्हा आम्ही रिलसाठी शुटींग करत होतो तेव्हा हे सुपर बाबा आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेमळ पद्धतीने विचारले की, त्यांची मुलं आमच्याबरोबर नाचू शकतात का? मला वाटते की ते मंगळुरुच्या सहलीवर आले होते आणि त्या मुलांमुळे खूप सकारात्मक वातावरण झाले होते, विशेषत: त्या लहान मुलांमुळे. त्याने आम्हा सर्वांचे मन जिंकले. आम्ही त्यांच्यासह नाचलो आणि त्यांचे पालक देखील खूप आनंदी झाले, विशेषत: त्यांचे बाबा. ते सतत पाठिंबा देत होते. मला हे मान्य आहे की सर्वांना भरपूर पैसा कमवायचा आहे, महागडे जीवन जगायचे आहे पण कधी कधी हे छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यात देखील वेगळीच मज्जा असते.”

हेही वाचा : स्ट्रीट फूड विक्रेत्याने बनवलेला खतरनाक पराठा पाहून घाबरले लोक! म्हणाले,”फाशी ऐवजी हा पराठा खायला द्या”

हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून लोक झाले आनंदी

या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वडिलांच्या हावभावाने सोशल मीडिया युजर देखील आनंदी होत आहेत.

व्हिडिओतील वडिलांना उद्देशून एका यूजरने म्हटले, “अरे, जर तुम्ही हे वाचत असाल तर जाणून घ्या, तुम्ही खरोखर आश्चर्यकारक आहात. प्रत्येक मुलाला त्यांच्या पालकांकडून हेच हवे असते – कोणतीही तुलना नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे थोडेसा पाठींबा.”

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा

Story img Loader