Vande Bharat Express Viral News : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. आताही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपतीहून सिकंदराबादला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक प्रवासी विनातिकीट ट्रेनमध्ये चढला आणि त्याने स्वत:ला टॉयलेटमध्ये बंद केलं. परंतु, त्यानंतर असं काही घडलं, जे पाहून सर्वच प्रवाशांना धक्का बसला.
फ्लॅगशिप ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या फायर अलार्मकडे दुर्लक्ष करून एक व्यक्ती टॉयलेटमध्ये गेला आणि सिगारेटचे झुरके मारू लागला. त्यानंतर काही सेकंदातच अलार्म वाजला आणि डब्ब्यामध्ये असलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. या गंभीर घटनेमुळं ट्रेनमध्ये दहशत पसरली आणि प्रवाशांनी ट्रेनच्या गार्डला या घटनेबद्दल सांगण्यासाठी एमरजन्सी फोनचा वापर केला. त्यानंतर ट्रेन मनुबुलु स्टेशनवर थांबली.
रेल्वे पोलीस कर्मचारी आग विझवणाऱ्या यंत्राजवळ आले आणि खिडकीचा दरवाजा तोडला. त्यानंतर आतमध्ये एक प्रवासी असल्याचं पोलिसांना दिसलं. या प्रवाशामुळे ट्रेन थांबवण्यात आली आणि बचावकार्य सुरु झालं. ट्रेनमध्ये धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला नेल्लोर येथे अटक केली आणि ट्रेन पुन्हा सुरु झाली.
दक्षिण मध्य रेल्वे (एससीआर) झोनच्या विजयवाडा डिव्हिजनच्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, एक प्रवासी विनातिकिट तिरुपतीहून ट्रेनमध्ये चढला आणि त्याने स्वत:ला सी-१३ कोचच्या टॉयलेटमध्ये बंद केलं. त्याने टॉयलेटमध्ये धुम्रपान केलं. त्यामुळे एमरजन्सी अलार्म वाजला आणि ट्रेन काही काळ थांबवण्यात आली.