Viral video: पावसाळा हा रोमॅटिंक सिझन समजला जातो. पाऊस आला की प्रत्येक जण आपल्या पध्दतीने मॉन्सूनचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. पण खरी गंम्मत तेव्हा येते जेव्हा आपण पावसात भिजता भिजता अचानक घसरून पडतो. कितीही हळू चालत असलो, कितीही काळजी घेतली तरी कधी पाय सटकतो आणि आपण घसरून पडतो कळतंच नाही. दुसऱ्यांना पडताना पाहून लोकांना कितीही हसू येत असले तरी स्वतःवर पडण्याची वेळ आल्यावर मात्र रडू कोसळल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे जो पाहिल्याशिवाय पावसाळा सुरु झाल्यासारखं वाटत नाही. हा व्हिडीओ दरवर्षी पावसाळा सुरु व्हायच्या वेळी व्हायरल होतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
कित्येकदा पावसाळ्यात होणाऱ्या या धडपडीमुळे मोठी दुखापत होऊ शकते. कित्येकदा पावसामुळे निसरडा झालेल्या रस्त्यावर गाड्याही धप्पा धप्प आपटतात. त्यामुळे गंभीर वेदनादायक जखम, मुरगळा, फॅक्चर असे काहीही होऊ शकते. तुम्हाला घाबरविण्याचा मुळीच हेतू नाही पण काळजी घ्यायला काय हरकत आहे. पावसाळ्यात अचानक पडण्यामागे अनेक कारणे असून शकतात. कित्येकदा आपली पायतील चप्पल किंवा सँडल चूकीचे असून शकतात, चालताना तुमचा तोल जाऊ शकतो.
पावसाळा सुरु झाला की घरावर ताडपत्री टाकण्याचा कार्यक्रम सुरु होतो. अशावेळी घरातली तरुण मंडळी किंवा पुरुष पत्र्यावर किंवा कौलारु घरांवर चढतात आणि ताडपत्री घालतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये घराच्या पत्र्यावर पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी ताडपत्री टाकत असताना घराच्या छतावरून पाय घसरून हा व्यक्ती घसरत घसरत खाली आल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. प्रत्येक पावसाळ्यात हा व्हिडीओ व्हायरल होतो मात्र तो तेवढाच नवा वाटतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: काळ आला होता पण वेळ आली नव्हती…नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, थरकाप उडवणारा अपघात
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आता मान्सूनचं राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.
हा व्हिडीओ best_of_kokani’s नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.