Funny video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हि़डीओ पाहून धक्का बसतो. असाच एक पोट धरुन हसवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मुलांच्या मनात नेहमी एक प्रश्न घोळत असतो. तो म्हणजे मुलींना आपल्यातील कोणती गोष्ट आणि नेमकं काय आवडतं? आपण कसे वागलो तर त्या इम्प्रेस होतील? यासाठी तरुण संधी मिळेल तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी करत मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका तरुणाचा मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात चांगलाच पचका झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

हा व्हिडीओ बिहारमधील बाघा येथील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला आणि तरुणीला भोजपूरी गाण्यावर नाचताचा पाहू शकता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक तरुण मोठ्या ऐटित स्टेजवर आला आणि स्टंट मारून दाखवण्याचा प्रयत्न करून लागला. लक्षवेधी बाब म्हणजे त्यानं आधी टाळ्या वगैरे वाजवून माहोल तयार केला. त्यामुळे अर्थातच लोकांना वाटलं हा काय करून दाखवणार आहे अन् काय नाही. पण तो तर फुसका बार निघाला. कारण कोलांटी उडी मारताच तो खाली पडला आणि अक्षरश: स्टेजही तुटला. ज्या मुलींना इंप्रेस करण्यासाठी त्यानं स्टंट मारला त्यांच्यासमोरच तो अक्षरश: तोंडावर पडला.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल

लोकांना आधी वाटलं हा त्याच्या स्टंटचाच पार्ट असावा. पण नंतर कळलं त्याला दुखापत झाली आहे. मग आसपासची लोकं त्याच्या मदतीसाठी धावून गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “म्हणून कुणालाच कमी समजू नका” शिकार करायला आलेल्या बिबट्याला कुत्र्यानं फाडून टाकलं; थरारक VIDEO व्हायरल

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ saini_mukesh6165 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. खरं तर हा व्हिडीओ जुना आहे. पण पुन्हा एकदा व्हायरल होतोय. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून “जर झेपत नाही तर मग शायनिंग मारायला गेलासच का?” असं एकानं म्हंटलं आहे. तर आणखी एकानं “काय गरज होती का? बिचारा मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् तोंडावर पडला” अशी प्रतिक्रिया दिली आहे.अनेकांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय असे स्टंट करू नका असे सल्ले सुद्धा काही जणांनी दिले आहेत.

Story img Loader