आजकाल मोबाइल वापरताना आपण इतकं गुंग असतो की आपल्या आजुबाजूला काय सुरु आहे, याची अनेकदा आपल्याला कल्पनाही नसते. अनेकदा फोनवर बोलत असताना अपघात झाल्याचे अनेक प्रकार आपण ऐकलेत. उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. अनेकवेळा आत्महत्येचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फोनवर बोलण्याच्या नादात इमारतीवरून पडल्याची घटना घडली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निष्काळजीपणा नडला!
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या सर्वात उंच ठिकाणी उभी असल्याचे दिसत आहे. मग अचानक तो खाली उडी मारतो. खाली उडी मारल्यानंतर, तो छताला पकडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते धरता येत नाही आणि तो रस्त्यावरील वाहनांमध्ये थेट खाली पडतो. हा नऊ सेकंदाचा व्हिडिओ थरकाप उडवणारा आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आत्महत्येचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अनेक घटनांमध्ये आजूबाजूचे लोक किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्राण वाचवले, तर अनेक घटनांमध्ये लोकांना जीव गमवावा लागला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून बहुतांश युजर्स शॉक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – बाप-लेकाचा दुर्दैवी अंत! रेल्वे ट्रॅक ओलांडत असतानाच ट्रेनने दिली धडक; VIDEO पाहून उडेल थरकाप
नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार होता, पण तेवढ्यात काही सुरक्षा कर्मचारी आले आणि त्यांनी त्याचा जीव वाचवला. मात्र यावेळी या व्यक्तीला कुणीही वाचवू शकले नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर नेटकरी यालर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. आजच्या काळात स्मार्ट फोन हा जणू मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.