Man slips while boarding moving train: रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन आहे. दररोज कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रेल्वेतील मजेशीर व्हिडीओ, तर रेल्वेतील भयानक गर्दीचे व्हिडीओ, कधी रेल्वे अपघाताचे व्हिडीओ तर रेल्वे प्रवासादरम्यानचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकदा अंगावर काटा येतो. अनेक लोक जीवघेणा प्रवास करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रेल्वेमध्ये अनेकदा अपघात होत असल्याचं समोर येतं. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक हैराण करणारा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. मात्र, हा व्हिडीओ पाहून सगळे हेच म्हणत आहेत की, देव तारी त्याला कोण मारी. रेल्वेस्थानकावर चालती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलं असतं. रेल्वेस्थानकावरील फलाटावर एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी त्याचा तोल गेला आणि नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
हा व्हिडीओ एका वेगवान ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा आहे. मात्र, या प्रयत्नादरम्यान त्या बिचाऱ्याचे जे काही झाले ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले. त्या व्यक्तीशी संबंधित या धक्कादायक व्हिडीओला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.
(हे ही वाचा : Video: ऑटोमध्ये किती प्रवासी बसले आहेत? ‘या’ व्हायरल व्हिडीओतील आकडा पाहून विश्वासच बसणार नाही! )
वेगवान ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता प्रवासी
सुरुवातीपासूनचा व्हिडीओ पाहता पॅसेंजर ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघून गेल्याचे दिसते. ट्रेनचा हळू हळू वेग वाढत असल्याचे दिसते. पण, वेग वाढणाऱ्या या ट्रेनमध्ये काही लोक चढण्याचा प्रयत्न करतात, हे पाहून तुम्हाला धक्का बसेल. फ्रेमच्या पुढच्या भागात, एक व्यक्ती अशा धोकादायक प्रयत्नात यशस्वी झाल्याचे आपण पाहू शकतो. तो कसा तरी ट्रेनमध्ये चढला. आता नजर अशाच दुसऱ्या माणसाकडे जाते. ट्रेनमध्ये चढण्यासाठी तो ट्रेनच्या जवळ जातो आणि हँडल धरून स्वतःचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो.
येथे पाहा व्हिडिओ
मात्र, त्या व्यक्तीने हँडल घट्ट पकडण्यापूर्वीच त्याचा तोल गेला. त्या व्यक्तीचा पाय घसरला आणि तो खाली पडू लागला. व्हिडीओमधला हा सीन असा आहे की, तो पाहिल्यानंतर कुणालाही हसू येईल. याच्या शेवटी आपण पाहणार आहोत की, ती व्यक्ती रुळाखाली येण्यापासून थोडक्यात वाचली. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्याची माहिती आहे. इन्स्टाग्रामवर rohitgeneral295 नावाच्या हँडलरने शेअर केले आहे.