crocodile video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. मगर जी इतकी खतरनाक, तिच्या शिकारीची पद्धत इतकी भयानक की तिच्यासमोर वाघ, सिंह, बिबट्या असे शक्तिशाली प्राणीही टिकत नाही. तिच्या तावडीत सापडल्यावर यांचीही सुटका होत नाही. त्यांचा मृत्यू निश्चित असतो. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ वेळोवेळी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरींना खायला घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही शॉक बसेल.
मगरीला खायला घालायला गेला नदीकाठी
५४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीच्या काठावर असल्याचे दिसून येते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मगरींसाठी खायला आणतो, आणि मगरींना खायला घालतो. विशेष म्हणजे मगरी देखील हल्ला न करता अन्न खातात आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: नदीकाठी पाणी पिणाऱ्या सिंहासमोर आला कासव अन्…शेवटी सिंहालाच मानावी लागली हार
या व्हिडीओला आतापर्यंत ४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे याची पुष्टी झालेली नाही, मात्र तो जोरदार व्हायरल होत आहे हे नक्की.