Horse Eating In Ferrari : सामान्य लोकांसाठी करोडो रुपयांची ‘फरारी कार’ खरेदी करणे हे एका स्वप्नासारखे असते. यामुळे अनेक लोक दूरवरून या कारसोबत फोटो काढण्यातच समाधान मानतात. पण ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांच्यासाठी ही फार मोठी गोष्ट नाही. श्रीमंत लोक कोणताही आवडती महाग गोष्टी सहज खरेदी करु शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये तुम्हाला याची प्रचिती येईल. एक श्रीमंत व्यक्तीने चक्क ‘फरारी’ कारवर घोड्याला चारा खायला दिला आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका फार्म हाऊसमध्ये एक फरारी कार पार्क केली आहे. लाल रंगाच्या या फेरारीच्या बोनेटवर गवत ठेवले आहे. जे घोडा अगदी आरामात खाताना दिसत आहे. एवढी महागडी कार अशा प्रकारे वापरणे हे दाखवून देते की, माणसाकडे अमाप पैसा असेल तो कोणतीही गोष्ट शक्य करु शकतो.
आता मी फेरारी कार घेणार नाही, व्हिडीओवर युजर्सच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (@philipirelandsupercars) नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की- भारतीय फेरारी मालकांना हा व्हिडिओ आवडणार नाही. तर दुसरा एक युजर म्हणाला की, आता मी फेरारी कार घेणार नाही. त्याच वेळी तिसऱ्या एका युजरने लिहिले की, कोणी या कारच्या मालकाची ओळख करून देऊ शकेल का?. अशा प्रकारे एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स युजर्स करत आहेत.